News Flash

…म्हणून रणवीरच्या वाहन चालकाची दीपिकाकडून हकालपट्टी 

रणवीरसोबतच्या नात्यालाही ती नेहमीच प्राधान्य देते.

deepika padukone
दीपिका पदुकोण

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या नात्याचा अद्यापही खुलेपणाने स्वीकार केलेला नाही. चित्रपटसृष्टीत सध्याच्या घडीला ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून ओळखल्या जाणारा रणवीर आणि दीपिकाने त्यांचं नातं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही काही केल्या या दोघांचं प्रेम आणि एकमेकांप्रती वाटणारी चिंता या सर्व गोष्टी समोर येतातच. दीपिका सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यग्र असली तरीही रणवीरसोबतच्या आपल्या नात्यालाही ती तितकेच प्राधान्य देत आहे.

मुख्य म्हणजे आपल्या अनुपस्थितीतही रणवीरला कोणतीच इजा पोहोचू नये याबाबतही दीपिका नेहमीच सजग असल्याचं पाहायला मिळत असल्याचा प्रत्यय नुकताच आला. ‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दीपिकाने रणवीरच्या वाहन चालकाची कामावरुन हकालपट्टी केली आहे. फुटबॉल सामन्यावरुन परतत असतेवेळी घाईत असणाऱ्या वाहन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे रणवीरची कार भिंतीवर जाऊन आदळली. ज्यामुळे मागे असणारी कार रणवीरच्या कारवर येऊन धडकली. सुदैवाने रणवीरला यात कोणतीच दुखापत झाली नाही.

वाचा : ‘ख्वाबों की शहजादी’ निघून जाते तेव्हा…

या घटनेनंतर रणवीरने वाहन चालकाला चांगलेच सुनावले. जेव्हा दीपिकाला याविषयीची माहिती मिळाली तेव्हा तिचा राग अनावर झाला आणि तिने लगेचच त्या चालकाची कामावरुन हकालपट्टी केली. त्यामुळे रणवीरविषयी दीपिका प्रचंड काळजी करत असल्याचं स्पष्ट होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 12:43 pm

Web Title: bollywood actress deepika padukone intruded in bae actor ranveer singhs life to make sure he was safe
Next Stories
1 मराठी भाषा दिन : लाभले आम्हास भाग्य…
2 …म्हणून ऐश्वर्या, सलमान एकमेकांसमोर येणार नाहीत
3 …तर श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे पुन्हा शवविच्छेदन
Just Now!
X