News Flash

VIDEO: दीपिकाने उलगडले तिच्या निरोगी स्वास्थ्याचे रहस्य

सध्या दीपिका आगामी 'पद्मावती' चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे

VIDEO: दीपिकाने उलगडले तिच्या निरोगी स्वास्थ्याचे रहस्य
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

‘ओम शांति ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचा स्वत:चा असा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. विविध धाटणीच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर दीपिकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वत:ची छाप पाडली आहे. दीपिकाच्या प्रसिद्धीचा, तिच्या सौंदर्याचा अनेकांनाच हेवा वाटतो. त्यामुळे चाहत्यांचं हे प्रेम आणि आपल्याबद्दल असणारे हे कुतूहल पाहता दीपिकाने एका व्हिडिओद्वारे तिच्या निरोगी स्वास्थ्याबद्दल माहिती दिली.

‘केलॉग्स स्पेशल के’च्या एका जाहिरातीमध्ये दीपिकाने तिच्या सुडौल बांध्याचेही रहस्य उलगडले आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी दीपिकाने काही जाहिरातींमध्येही काम केले होते. सध्या चित्रपटांतून झळकणारी ही मस्तानी जाहिरातीद्वारेही विविध रुपांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापैकीच तिचे हे एक रुप. अभिनेत्रींचा सुडौल बांधा आणि त्यांचे सुदृढ शरीर पाहिले की त्यामागे नेमके काय गुपित दडलेले असेल, असाच प्रश्न अनेकांनाच पडतो. मग सुरुवात होते ती म्हणजे तर्कवितर्कांची. ती अभिनेत्री किंवा अभिनेता नेमकं काय खात असतील? त्यांचं डाएट कसं असेल..? हे सारे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात घर करत असताना आता दीपिकाने यावरुन पडदा उचलला आहे. सोशल मीडियावरही दीपिकाची ही जाहिरात बरीच गाजतेय.

दरम्यान, सध्या दीपिका ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र असून, यामध्ये ती राणी पद्मावतीच्या भूमिकेत झळकणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये दीपिकासोबतच अभिनेता रणवीर सिंग आणि शाहिद कपूरसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने भन्साळी पुन्हा एकदा दीपिका-रणवीरची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या वाटेत येणाऱ्या अडचणी पाहता भन्साळी सध्या चित्रपटाच्या बाबतीच जास्तच सावधगिरी बाळगत असल्याचे दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 11:15 am

Web Title: bollywood actress deepika padukone reveals some secrets to her fans and it is quite relevant
Next Stories
1 यूटय़ूबवरील मराठी अद्याप बाल्यावस्थेत
2 सेलिब्रिटी क्रश : ‘तिला पटवण्याची मी पैज लावलेली’
3 ‘बेगम जान’नंतर अभिनेत्री पल्लवी शारदाचे हॉलिवूडमध्ये पदार्पण?
Just Now!
X