देशात आलेल्या करोना नावाच्या वादळामुळे जनजीवन उद्वस्त झालंय. दररोज करोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे देशाच्या आरोग्य सुविधेवरील ताणदेखईल वाढू लागला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या महामारीपासून दूर राहू शकलेले नाहित. अनेक बॉलिवूड कलाकारांनंतर बॉलिवूडची मस्तानी दीपिका पोदूकोणला देखील करोनाची लागण झाली आहे. दीपिका पोदूकोणच्या संपूर्ण कुटुंबालाच करोनाची लागण झाल्याचं वृत्त नुकतचं समोर आलं होत. त्यानंतर आता दीपिकाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वडिलांनंतर दीपिकाला देखील करोनाची लागण झाली आहे. दीपिका पादूकोणचे वडील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादूकोण तसचं दीपिकाची आई आणि बहिणी या तिघांना करोनाची लागण झालीय. १० दिवसांपूर्वीच दीपिकाच्या आई, बहिण आणि वडिलांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला होता. या सर्वांना बंगळूरू इथल्या भगवान महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर एक आठवड्यातच दीपिकाच्या आई उज्ज्वला पदूकोण आणि बहिण अनिशा पदूकोण यांची प्रकृती सुधारली आहे. परंतू दीपिकाचे वडील प्रकाश पदूकोण यांनी करोनावर मात केली नसली तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. अभिनेत्री दीपिका पदूकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलं. “जेव्हा मी, माझं कुटूंब आणि आपण सर्वच जण ठीक होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहीजे की आपल्याला भावनात्मक रूपातूनही ठीक होणं गरजेचं असतं.” कुटूंबावर कोसळलेल्या या करोना संकटात ती त्यांच्यापासून दूर असली तरी फोनद्वारे संपर्क करून त्यांची साथ देतेय. या पोस्टमध्ये तिनं, ‘यु आर नॉट अलोन’ हा हॅशटॅग वापरला आहे. View this post on Instagram A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) मुंबईत कडक निर्बंध लागू केल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादूकोण रणवीर सिंहसोबत तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बंगळुरूला गेली होती. दोघांना एअरपोर्टवर स्पॉट देखील करण्यात आलं होतं. या आधी देखील बॉलिवूडमध्य़े अनेकांना करोनाचा सामना करावा लागलाय. अभिनेता रणबीर कपूर, मिलिंद सोमण, मनोज वाजपेयी तसचं अभिनेत्री आलिया भट्ट आणि हिना खान यांना करोनाची लागण झाली होती.