22 November 2017

News Flash

बॉलिवूडवर विम्बल्डनचा ‘रॉजर’ फिव्हर

'व्हॉट अॅन अॅब्सोल्यूट लिजंड'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 2:09 PM

छाया सौजन्य- ट्विटर

बॉलिवूड विश्वात गेल्या काही दिवसांपासून आयफा पुरस्कार सोहळ्याचीच चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतंय. सेलिब्रिटींच्या पेहरावापासून ते अगदी त्यांचे पुरस्कार आणि रेड कार्पेट अपियरन्सपर्यंतच्या चर्चा पाहायला मिळाल्या. इथे आयफाच्या पुरस्कारांची चर्चा सुरु असतानाच काही सेलिब्रिटींनी मात्र क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर प्रतिक्रिया देण्याला प्राधान्य दिलं. विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात टेनिस विश्वाचा अभिजात सम्राट समजल्या जाणाऱ्या रॉजर फेडररच्या जेतेपदाचा आनंद व्यक्त करत या कलाकारांनी ट्विट केले. त्यामुळे बॉलिवूडवरही विम्बल्डनचा ‘रॉजर’ फिव्हर पाहायला मिळाला असंच म्हणावं लागेल.

रॉजर फेडररने पुन्हा एकदा टेनिस या खेळामध्ये त्याचं वर्चस्व सिद्ध करत आठव्यांदा विम्बल्डनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. त्याच्या याच कामगिरीमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण, धनुष, अमिताभ बच्चन यांनीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. ‘व्हॉट अॅन अॅब्सोल्यूट लिजंड’, असं दीपिकाने ट्विट केलं. तर, बिग बी अमिताभ बच्चन यांनीसुद्धा प्रशांत कवाडिया या युजरचे ट्विट रिट्वीट करत हा आनंद व्यक्त केला. प्रशांतने ट्विट केलेल्या फोटोमध्ये बिग बी, दीपिका आणि फेडरर यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळतंय.

बॉलिवूड कलाकारांसोबतच अभिनेता, दिग्दर्शक धनुषनेही विम्बल्डनचा हा अंतिम सामना ‘याचीदेही याची डोळा’ पाहायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. रविवारी पार पडलेल्या या सामन्यामध्ये सुरुवातीपासूनच फेडररचं पारडं जड असल्याचं पाहायल मिळालं. त्यामुळे फेडररने पुन्हा एकदा या खेळावर त्याची जबर पकड दाखवून दिली आहे असं म्हणायला हरकत नाही.

First Published on July 17, 2017 1:07 pm

Web Title: bollywood actress deepika padukone to amitabh bachchan bollywood is celebrating tennis star roger federers eighth wimbledon title grandslam