21 January 2021

News Flash

VIDEO : ‘मीनम्मा’चं याड बाई लागलं दीपिकाला

चित्रपटाच्या सेटवर किती खेळीमेळीचं आणि उत्साही वातावरण असतं याचीही झलक पाहायला मिळत आहे.

दीपिका पादुकोण, deepika

दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान ही अनेकांच्याच आवडीची जोडी. अशा या जोडीचा एक सुपरहिट चित्रपट म्हणजे ‘चेन्नई एक्स्प्रेस’. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होतीच. पण, त्यासोबतच खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या काही लक्षात राहिलं असेल तर तो म्हणजे दीपिका पादुकोणचा अभिनय.

‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये दाक्षिणात्य भूमिकेसाठी तिने फारच मेहनत घेतली होती. अगदी तिच्या लूकपासून बोलण्याच्या अंदाजापर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये दीपिकाने बारकावे टीपत ‘मीनम्मा’ हे पात्र रंगवलं होतं. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरीच वर्षे उलटली आहेत. पण, तरीही त्याची लोकप्रियता मात्र काही कमी झालेली नाही.

पाहा : Loveratri Trailer : ‘लवरात्री’तून पाहता येणार नौरात्रोत्सव आणि प्रेमाचे अनोखे रंग

अशा या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘मीनम्मा’चं वारंच जणूकाही दीपिकाच्या अंगात शिरलं होतं, असं पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या सेटवर किती खेळीमेळीचं आणि उत्साही वातावरण असतं याचीही झलक पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे या व्हिडिओमध्ये फक्त दीपिकाच नाही, तर शाहरुख आणि खुद्द रोहित शेट्टीसुद्धा कल्ला करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये ज्याप्रमाणे दीपिकाने अंगात कोणा एकाचं वारं आल्याचा अभिनय केला होता तो आठवल्यावाचूनही राहात नाही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 5:46 pm

Web Title: bollywood actress deepika padukones video with shah rukh khan during movie chennai express shoot is more fun watch
Next Stories
1 फरहान अख्तर शिबानी दांडेकरला करतोय डेट?
2 ‘भाडीपा’च्या व्हिडिओत झळकणार अबिश मॅथ्यू; म्हणतोय, ‘भाऊ… मीपण मराठी’
3 उपचारांसाठी मित्राला आर्थिक साहाय्य करा, सनीचं सोशल मीडियाद्वारे आवाहन
Just Now!
X