25 February 2021

News Flash

VIDEO : राजेश खन्ना यांच्या गाण्यावर डिंपल कपाडियाने धरला ठेका

बॉलिवूडमध्ये काही चेहरे सध्याच्या घडीला रुपेरी पडद्यावर फारसे सक्रिय नसले तरीही त्यांची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही.

डिंपल कपाडिया

झगमगत्या बॉलिवूडमध्ये काही चेहरे सध्याच्या घडीला रुपेरी पडद्यावर फारसे सक्रिय नसले तरीही त्यांची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही. अशा चेहऱ्यांमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री डिंपल कपाडिया. ‘बॉबी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण करणाऱ्या डिंपल यांच्या लोकप्रयतेविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. एका वेगळ्याच अंदाजात आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीचा तो अंदाज आजही कायम आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहता असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

बी- टाऊनमधील सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या भाचीच्या म्हणजेच सौदामिनी मट्टूच्या रिसेप्शनमध्ये डिंपल यांचा हा अंदाज पाहायला मिळाला. बऱ्याच सेलिब्रिटींची उपस्थिती असणाऱ्या या रिसेप्शनमध्ये ‘जय जय शिव शंकर’ हे गाणं वाजू लागताच डिंपल त्यावर थिरकू लागल्या. राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं वाजू लागताच डिंपल स्वत:ला रोखू शकल्या नाहीत आणि त्यांनी या गाण्यावर ठेका धरण्यास सुरुवात केली.

वाचा : जाणून घ्या कोण आहे ‘तो’ झाडावर लटकून फोटो काढणारा अवलिया 

सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत असून, पुन्हा एकदा डिंपल यांचा दिलखुलास अंदाज चाहत्यांची मनं जिंकत आहे. सौदामिनी मट्टूच्या रिसेप्शनमधील बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यातीलच डिंपल यांचा हा व्हिडिओ बराच गाजतोय हे खरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 1:31 pm

Web Title: bollywood actress dimple kapadia dancing on rajesh khanna jai jai shiv shankar video viral
Next Stories
1 कठुआ बलात्कार प्रकरणातील बिग बींच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर चिडली पूजा भट्ट
2 महेश मांजरेकर यांची लेक सलमानच्या ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?
3 Bigg Boss Marathi: पहिली विकेट आरती सोलंकीची!
Just Now!
X