X
Advertisement

एकाच फ्रेममध्ये सलमान खानसोबत काम करणं सोपं नव्हतं- दिशा पटानी

म्हणाली, "स्वतःला सकारात्मक ठेवावं लागणार आहे"

‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. ‘भारत’ चित्रपटानंतर बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री दिशा पटानी हे दोघे दुसऱ्यांदा ‘राधे’मध्ये एकत्र आले आहेत. या चित्रपटात सलमान खानसोबत काम करताना आलेला अनुभव नुकतंच दिशा पटानीने शेअर केलाय. एकाच फ्रेममध्ये सलमान खानसोबत काम करणं सोपं नव्हतं, असं दिशा पटानीने सांगितलंय.

एका माध्यमाशी बोलताना तिने हे सांगितलं. सध्याच्या करोना काळातलं तिचं शेड्यूलही तिनं शेअर केलं. ती म्हणाली, “स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतेय. घरात एक ट्रेडमिल आहे, त्यावर मी रनिंग करतेय. डाएटवर लक्ष देणं थोडं अवघड जातंय, कारण घरी असल्यावर काय करावं हे सूचत नाही, मग जे पुढ्यात असेल ते खात जाते…करोनाची दुसरी लाट पाहता थोडी भिती देखील वाटतेय…परंतू या काळात स्वतःला सकारात्मक ठेवावं लागणार आहे. सर्वांना करोना लस मिळून पुन्हा सगळे पहिल्यासारखे काम करतील, अशी आशा करते.”

यापुढे बोलताना तिनं ‘राधे’ चित्रपटाबद्दल देखील सांगितलं. यावेळी ती म्हणाली, “या कठिण काळात का होईना आमचा चित्रपट प्रदर्शित झाला याचा आनंद आहे. मग ते डिजीटल असो वा चित्रपटगृह…याचा काही फरक पडत नाही…हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, त्यांचं मनोरंजन होतंय, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतोय, यातच आम्हाला समाधान वाटतंय.”

‘अभिनेत्री दिशा पटानी आणि दबंग अभिनेता सलमान खान या दोघांमधील वयाच्या अंतराबाबत चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. त्यानंतर चित्रपटात दोघांच्या किसींग सीनची देखील चर्चा रंगली होती. सलमान वयाच्या 55 व्या वर्षी हिरोच्या भूमिकेत झळकतोय आणि तरुण अभिनेत्रींसोबत रोमान्स करतोय. त्याचा हा अंदाज काही प्रेक्षकांना आवडेला नाही.

21
READ IN APP
X