News Flash

‘या’ व्हिडीओमुळे दिशा पटानी झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले…

"ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रुपये कट"

(photo-instagram@dishapatani)

आपल्या ग्लॅमरस फोटो आणि फिटनेसने अनेकांना घाय़ाळ करणारी अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. दिशाच्या एका पोस्टवर चाहत्यांच्या लाईकचा वर्षाव पाहायला मिळतो. यावेळी मात्र दिशाच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

दिशा पटानीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बोल्डनेस आणि फिटनेससाठी कौतुक होणाऱ्या दिशाने यावेळी मात्र नेटकऱ्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. दिशाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती केनियातील प्रसिद्ध कॉमेडियन Elsa Majimbo ची नक्कल करताना दिसतेय. यात ती सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या एल्साच्या स्टाइलमध्ये बोलताना दिसतेय. ” जर तुम्ही तुमचे पैसे खर्च केले नाहित तर कोण करणार?, जर तुमचे सर्व पैसै खर्च झाले तर काय होईल? मी पहिले उद्ध्वस्त झाले आहे. मी असं नाही केलं. जर मी पैसे खर्च करते, टॅक्स भरते म्हणजे मी माझ्या देशाचं भलं करते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दिशाने तिच्या या 15 सेकंदाच्या व्हिडीओतला खास कॅप्शन दिलं आहे. प्रत्येक वेळी माझं डोकं जेव्हा मी शॉपिंग करते.” असं ती म्हणाली आहे.. तर या व्हीडीओत ती मध्ये मध्ये जोरजोरात हसताना दिसतेय. मात्र नेटकऱ्यांना तिचा हा अंदाज काही आवडलेला नाही. अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

तर अनेक मीम्स तयार करून दिशाची खिल्ली उडवली आहे. एका युजरने तिच्या व्हिडीओवर म्हंटलं आहे. “ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रुपये कट”. तर दुसऱ्याने ‘मला काही नाही समजलं’ असं म्हणणाऱ्या अंगुरी भाभीचा फोटो शेअर केला आहे.

अनेक युजर्सनी दिशाला ‘आता तुला ब्लॉक करण्याची, अनफॉलो करण्याची वेळ आलीय’ असं म्हंटलं आहे.

‘मलंग’ सिनेमानंतर दिशा मोठ्या ब्रेकनंतर सलमान खानच्या ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात झळकरणार आहे. त्याचसोबत ‘एक व्हिलन-2’ या सिनेमात अर्जुन कपूर आणि जॉनसोबत ती मुख्य भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:22 pm

Web Title: bollywood actress disha patani troll after she posted video copying elsa majimbo kpw 89
Next Stories
1 शिल्पा शेट्टीच्या पतीचा ‘जोकर’ अवतार; म्हणाला, “मी वेगळा असल्याने ते….
2 सलमानच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी, लॉकडाऊनमुळे ‘राधे’चे प्रदर्शन लांबणीवर
3 Birthday Special: पहिल्या नजरेत प्रेम, अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांची लव्हस्टोरी
Just Now!
X