बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की, गौहरने सोशल साइटवर नेहमीच सक्रीय असते. आपले आगामी सिनेमे, कार्यक्रम या सर्वाची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना वेळोवेळी देत असते. तिचे चाहतेही तिच्या फोटो, व्हिडीओंना कमेंट देऊन प्रतिसाद देत असतात. पण तिच्या एका चाहत्याने नुकतीच अशी एक कमेंट केली की गौहरचा पारा चढला. तिने त्या चाहत्याला चांगलेच खडे बोल सुनावले.

अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी

गौहरने इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला. या फोटोत तिने काळ्या रंगाचे जॅकेट, पांढऱ्या रंगाचा क्रॉफ टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. फोटोमध्ये गौहर खूपच सुंदर दिसत आहे. तिने या फोटोला कॅप्शन देताना, जॅकेट डिझाइन करणाऱ्या डिझायनरचे आभार मानले. पण कमेंटमध्ये एकाने तिला पाकिस्तानी असे उद्देशून म्हटले की, ‘चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये तुझ्या टीमला पराभव पत्करावा लागला.’ ही कमेंट वाचताच गौहरचा पारा चढला तिने या चाहत्याला जसाश तसे उत्तर देण्याचे ठरवले.

तिने म्हटले की, ‘भारतच माझा देश आहे. मला असे वाटते की, तू परग्रहातून आला असावा. मला सर्व देशांप्रती प्रेम आहे. तसेच मी सर्व धर्मांचा सन्मान करते. मात्र तुझे विचार खूपच खूजे आहेत. त्यामुळे तू हे समजू शकणार नाहीस. मी तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करेन.’

VIDEO: राणा डग्गुबतीच्या आगामी चित्रपटाचा दमदार टिझर पाहिलात का?

गौहरने दिलेल्या उत्तरानंतर त्या चाहत्यांची अवस्था नक्की कशी असेल याचा विचार न केलेलाच बरा. तिच्या या उत्तराचे सध्या सिनेवर्तुळात कौतुक केले जात आहे. नेटिझन्सकडूनही तिला यासाठी भरपूरप्रमाणात पाठिंबा मिळत आहे. गौहर खानने नुकतेच विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या ‘बेगमजान’ या सिनेमात काम केले आहे.