News Flash

हुमाने अखेर केलं सलमानला ‘त्या’ नावाने हाक मारण्याचं धाडस

एखाद्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कशा प्रकारे त्याविषयीची उत्सुकता निर्माण करायची याविषयीच्या तंत्रांचा वापर सलमान खान अगदी सुरेखपणे करतो.

सलमान खान, हुमा कुरेशी

एखाद्या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये कशा प्रकारे त्याविषयीची उत्सुकता निर्माण करायची याविषयीच्या तंत्रांचा वापर सलमान खान अगदी सुरेखपणे करतो. आगामी ‘रेस ३’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्यावेळीसुद्धा त्याने अशीच खेळी केल्याचं पाहायला मिळालं. माध्यमं आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवल्यानंतर अखेर सलमानने ‘रेस ३’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. ज्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या या चित्रपटाच्या चर्चांनी जोर धरल्याचं पाहायला मिळालं.

एकाहून एक सरस संवाद आणि अॅक्शन सीन्सच्या जोरावर या ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. फक्त प्रेक्षकच नव्हे तर, कलाविश्वातही अनेकांनी भाईजान सलमानची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘रेस ३’ या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रशंसा केली. अभिनेत्री हुमा कुरेशीनेही मोठ्या उत्साहात सलमानच्या या ट्रेलरला रिट्विट करत त्यावर ‘किलर’ असं लिहिलं. या एकाच शब्दावर नेटकऱ्यांनी हुमाला निशाण्यावर घेत त्यावरुन तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.

वाचा : माधुरी… मराठी मनाचा सांस्कृतिक अभिमान

बऱ्याच ट्विटर युजर्सनी हुमाच्या चित्रपट कारकिर्दीवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत या कलाविश्वात सलमानचा असणारा दबदबा अधोरेखित केला. तर, काहींनी हुमाची प्रशंसा करत काळवीट शिकार प्रकरणाशी तिचं हे ट्विट जोडलं. काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमानचा जामीन अर्ज स्वीकारला असला तरीही हुमा मात्र त्याला उघडपणे ‘किलर’ असं संबोधतेय, तेव्हा तिच्या धाडसाची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे, असं उपरोधिकपणे म्हणत नेटकऱ्यांनी या ट्विट प्रकरणाला वेगळच वळण दिलं. त्यामुळे ‘रेस ३’च्या ट्रेलरची चर्चा एकिकडे आणि हुमाच्या या ट्विटची चर्चा एकिकडे असंच काहीसं वातावरण पाहायला मिळालं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 12:46 pm

Web Title: bollywood actress huma qureshi tweeted killer which reflects in social media buzz of salman khans blackbuck poaching case
Next Stories
1 कर्नाटकच्या राज्यपालांविषयीचं ट्विट उदय चोप्राला पडलं महागात
2 VIDEO : ‘धकधक गर्ल’ नव्हे, ही तर ‘स्वप्नांनी रंगणारी परी’
3 परफेक्शनिस्ट आमिरला बिग बींनी दिला कानमंत्र!
Just Now!
X