21 September 2020

News Flash

टॉपलेस फोटोपेक्षा इलियानाने लिहिलेलं कॅप्शन ठरतंय चर्चेचा विषय

काही दिवसांपूर्वी इलियाना एका मुलाखतीमुळे चर्चेत आली होती. ज्यामध्ये तिने गरोदरपणाच्या चर्चांविषयीसुद्धा मौन सोडलं होतं.

Ileana DCruz, इलियाना डि

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या चर्चेत असते ते म्हणजे तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. विविध विषयांवर ठामपणे मतप्रदर्शन करणाऱ्या इलियानाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील प्रत्येक पोस्ट अनेकांचच लक्ष वेधून जाते. सध्याही तिने पोस्ट केलेला असाच एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. मुळात त्या फोटोसोबत तिने लिहिलेलं कॅप्शनच जास्त प्रभावी ठरत आहे.

कृष्णधवल रंगात इलियानाने तिचा एक टॉपलेस फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमधून एक वेगळाच दृष्टीकोन मांडला आहे. कोणाच्याही विचारांवर किंवा त्यांच्या मतांवर अवलंबून राहू नका कारण, तुम्ही कोणाच्याच अधीन नाही. तुमचं असं एक वेगळं अस्तित्वं आहे, हे तिने या कॅप्शनच्या माध्यमातून अतिशय सुरेखपणे मांडलं आहे.

वाचा : लोअर परळच्या चाळीतून ‘आशियाई’च्या मैदानात!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इलियाना एका मुलाखतीमुळे चर्चेत आली होती. ज्यामध्ये तिने गरोदरपणाच्या चर्चांविषयीसुद्धा मौन सोडलं होतं. ‘मी गरोदर नाहीये. जर गरोदर असते तर मला नक्कीच खूप जास्त आनंद झाला असता. ही गोष्ट कोणाला नको असते? पण, त्यासाठी सध्या खूप वेळ आहे, मला आताच्या घडीला गरोदरपणाची जबाबदारी नको आहे’, असं म्हणत तिने सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 12:47 pm

Web Title: bollywood actress ileana dcruz goes topless in her latest instagram post see her caption gathering applauds
Next Stories
1 कवी कुमार आझाद म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व -वरुन धवन
2 २० वर्षांनंतर सलमान रंभा आले एकत्र, फोटो व्हायरल
3 अजय देवगण साकारणार चाणक्य
Just Now!
X