10 April 2020

News Flash

सर्वात सेक्सी महिला; तिने कतरिना, प्रियांकालाही टाकले मागे

'रुप नको गुण पहा', तिची सौंदर्याची व्याख्याच निराळी आहे

काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील ‘इस्टर्न आय’ या वृत्तपत्राने आशियातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या सेक्सी पुरुषांची यादी जाहीर केली होती. यात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला २०१९ आणि या दशकाचा सर्वात सेक्सीएस्ट पुरुष म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट २०१९ मधील सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरली आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण संपूर्ण दशकातील सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरली आहे. लंडनमध्ये बुधवारी एका ऑनलाईन स्पर्धेमध्ये या दोघींना हा मान मिळाला आहे.

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या आलियासाठी यंदाच वर्ष खास ठरलं आहे. या वर्षभरात तिला अनेक पुरस्कार मिळाले. तसंच तिचा ‘गली बॉय’ हा चित्रपट ऑस्करसाठी भारतातून अधिकृतपणे पाठविण्यात आला. “माझ्या मते जे बाहेरुन दिसतं ते खरं सौंदर्य नाही. तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात यावर तुमचं सौंदर्य ठरतं. कारण वृद्धत्व आल्यानंतर बाह्य सौंदर्य टिकत नाही. पण जर तुम्ही मनाने सुंदर असला तर हे सौंदर्य कायम राहतं”, असं आलियाने यावेळी सांगितलं.

 

View this post on Instagram

 

play. seize the day. celebrate every beautiful hair day

A post shared by Alia (@aliaabhatt) on


“आलिया भटसारखं नावाजलेलं नाव सध्या कुठेच दिसत नाही आणि व्यावसायिक हिंदी चित्रपटांमध्येदेखील पुढील दशकात ती बॉलिवूड क्वीनसारखं राज्य करेल”, असं ‘इस्टर्न आयचे एन्टरटेन्मेंट संपादक आणि या यादीचे संस्थापक असजाद नजीर म्हणाले.

दरम्यान, ‘सेक्सिएस्ट एशियन फिमेल’ ची यादी ऑनलाईन मतदान, मीडिया कव्हरेज, सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आदींच्या आधारे ठरते.  या यादीत दीपिका गेल्यावर्षी शीर्षस्थानी होती. यावर्षी ती एक क्रमांक खाली घसरून दुसऱ्या स्थानी आली. त्यानंतर अनुक्रमे हिना खान, माहिरा खान, सुरभी चंदना, कतरिना कैफ, शिवांगी जोशी, निया शर्मा, मेहविश हयात, प्रियांका चोप्रा या टॉप टेन सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 11:15 am

Web Title: bollywood actress is sexiest asian female of 2019 deepika padukone sexiest of decade in uk poll ssj 93
Next Stories
1 जाट समुदायाचा विरोध : ‘पानीपत’मधून वादग्रस्त भाग काढला
2 रजनीकांत यांना बालपणी साकारायला आवडायची ‘ही’ भूमिका
3 रेखा यांच्याशी स्वतःची तुलना करणाऱ्या साराची वरूण धवननं घेतली फिरकी
Just Now!
X