News Flash

Video : ‘एक,दो, तीन’! वर्कआऊटचा कंटाळा आल्यानं इशानं बघा काय केलं?

पाहा, इशाचा भन्नाट डान्स

(सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

बॉलिवूड सेलिब्रिटी बऱ्याच वेळा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असतात. त्यामुळे अनेकदा ते त्यांच्याशी निगडीत फोटो किंवा व्हिडीओच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या लॉकडाउनच्या काळात सारं काही बंद असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी घरच्या घरीच वर्कआऊट करत होते. या मध्येच अभिनेत्री इशा कोप्पीकरदेखील घरीच वर्कआऊट करत होती. मात्र, सतत जीम, वर्कआऊट आणि व्यायाम प्रकार करुन कंटाळल्यानंतर ती नेमकं काय करते हे तिने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

इशाने नुकताच सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती वर्कआऊट करत असताना अचानक माधुरी दीक्षितचं एक दो तीन हे गाणं लावते आणि त्यावर भन्नाट डान्स करते.  डान्स करणं हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे वर्कआऊट कंटाळा आला तर असा एखादा डान्स करा असा संदेश तिने या व्हिडीओच्या  माध्यमातून दिला आहे. सोबतच तिने एक छानसं कॅप्शनही या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, इशा कोप्पीकर हिचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. इशाने २००२ साली राम गोपाल वर्माच्या गाजलेल्या ‘कंपनी’ चित्रपटात ‘खल्लास’ हे आयटम साँग केले होते. या आयटम साँगमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे आजही ती खल्लास गर्ल याच नावानेच बॉलिवूडमध्ये ओळखली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 3:48 pm

Web Title: bollywood actress isha koppikar workout funny dance video ssj 93
Next Stories
1 निक्की तांबोळीमुळे साराच्या डोळ्याला दुखापत; ‘बिग बॉस’मध्ये एडिट केला सीन
2 ‘२ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी काहीही’; सलमान-अक्षयवर आरोप करणारा केआरके होतोय ट्रोल
3 होणाऱ्या पतीसोबत काजल अगरवालचे फोटो व्हायरल
Just Now!
X