04 March 2021

News Flash

काजोलने नाकारलेली शाहरुखच्या बहिणीची भूमिका

शाहरुखसोबतचे आधीचे चित्रपट आणि एकंदर समीकरण पाहता तिने त्याच्या बहिणीची भूमिका साकारण्यास नकार दिला.

काजोल, शाहरुख खान

नव्वदच्या दशकात काही अभिनेते आणि अभिनेत्रींनी या कलाविश्वात असं काही स्थान प्रस्थापित केलं की आजतागायत त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. अशाच काही कलाकारांमध्ये विशेष गाजल्या त्या म्हणजे ऑनस्क्रीन जोड्या. याच जोड्यांमध्ये अनेकांच्या आवडीच्या जोडीचं नाव घ्यायला सांगितलं तर अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांचच नाव पुढे येतं.

‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘करण-अर्जुन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांतून झळकलेल्या या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री म्हणजे एक वेगळं आणि समजण्यापलीकडलं समीकरण. पण, तुम्हाला माहितीये का, शाहरुखच्या प्रेयसी किंवा पत्नीच्या भूमिकेत झळकणाऱ्या काजोलला एका चित्रपटासाठी त्याच्या बहिणीच्या भूमिकेसाठीही विचारण्यात आलं होतं.

वाचा : काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट

शाहरुखच्या बहिणीच्या याच भूमिकेस स्पष्ट नकार दिला होता. तो चित्रपट होता २००० मध्ये प्रदर्शित झालेला ‘जोश’. या चित्रपटात शिर्ले या शाहरुखच्या ऑनस्क्रीन बहिणीच्या भूमिकेसाठी काजोलला विचारण्यात आलं होतं. पण, शाहरुखसोबतचे आधीचे चित्रपट आणि एकंदर समीकरण पाहता तिने त्याच्या बहिणीची भूमिका साकारण्यास नकार दिला. ज्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या रायने ही भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 3:30 pm

Web Title: bollywood actress kajol refused to play shah rukh khans sister
Next Stories
1 ट्विंकल खन्नाचे हे ट्विट भीमा-कोरेगावप्रकरणी झालेल्या अटकसत्राबद्दल?
2 सनी लिओनी पुन्हा ठरली ‘नंबर वन’
3 प्रकाशझोतापासून दूर असणाऱ्या ‘त्या’ खेळाडूचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार
Just Now!
X