24 September 2020

News Flash

“बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांच्या रोलसाठी…,” जया बच्चन यांना प्रत्युत्तर देताना कंगनाचा नवा आरोप

"मी बॉलिवूडला स्त्रीवादाचा धडा दिला," कंगनाचं जया बच्चन यांना प्रत्युत्तर

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी केलेल्या अप्रत्यक्ष टीकेनंतर कंगना रणौतने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी राज्यसभेत शून्य प्रहरमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला होता. अभिनेते आणि भाजपा खासदार रवी किशन यांनी इंडस्ट्रीतील कलाकारांकडून होणाऱ्या ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित करत त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. जया बच्चन यांनी यावर आक्षेप घेत “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात”, अशा शब्दांत टीका केली होती.

कंगनाने जया बच्चन यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट केलं असून जया बच्चन आणि इंडस्ट्रीने मला कोणतीही ‘थाळी’ दिली नसल्याचं म्हटलं असून शय्यासोबत केल्यानंतर बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांची भूमिका मिळते असा आरोप केला आहे.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणती थाळी दिली आहे. एक थाळी मिळाली होती ज्यामध्ये दोन मिनिटांचे आयटम नंबर्स आणि एक रोमँटिक सीन मिळायचा तोदेखील हिरोसोबत झोपल्यानंतर…मी इंडस्ट्रीला स्त्रीवादाचा धडा दिला. थाळी देशभक्ती, स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवली. जयाजी ही माझी थाळी आहे तुमची नाही”.

आणखी वाचा- ‘माझ्याजागी तुमची मुलगी असती तर..’; कंगनाचं जया बच्चन यांना सडेतोड उत्तर

आणखी वाचा- “उद्धव ठाकरेंऐवजी फडणवीस मुख्यमंत्री असते तर…”; कंगनाचे आणखी एक ट्विट

जया बच्चन यांनी कंगनाचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली होती. यानंतर कंगनाने लगेचच ट्विट करत माझ्या जागी तुमची मुलगी श्वेता असती तर तुम्ही असंच म्हणाला असता का असा सवाल विचारला होता. इतकंच नाही तर अभिषेक सातत्याने छळ व गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटकल्याचं दिसून आलं तर ? असा सवाल विचारत आमच्यासाठी सुद्धा कधीतरी प्रेमाने हात जोडण्याचा प्रयत्न करा असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 1:15 pm

Web Title: bollywood actress kangana ranaut answer back to mp jaya bachchan sgy 87
Next Stories
1 ..म्हणून संजय दत्तने अचानक सोडली मुंबई
2 ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची करोनावर मात
3 ‘हा तर देवाचा अपमान’; ओम प्रिंट असलेले कपडे परिधान केल्यामुळे अंकिता ट्रोल
Just Now!
X