19 December 2018

News Flash

‘त्या’ रिलेशनशिपविषयी कंगना म्हणते….

तिच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा रंगल्या

कंगना रणौत

बॉलिवूडमध्ये कलाकार हे त्यांच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. आपल्या कामाच्या बळावर स्वत:ची ओळख प्रस्थापित झाल्यानंतर त्या कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात अनेकजण रस दाखवतात. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री कंगना रणौतचं. कोणाचाही वरदहस्त नसताना कंगना या चित्रपटसृष्टीत आली आणि मोठ्या संघर्षानंतर तिने स्वत:ला सिद्ध करत आपला असा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. कंगना तिच्या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आली खरी पण, त्यासोबतच तिच्या खासगी आयुष्याविषयीच्या चर्चांनी सुद्धा अनेकांचं लक्ष वेधलं.

अभिनेता हृतिक रोशन, अध्ययन सुमन, आदित्य पांचोली यांच्यासोबतचं तिचं नातं आणि त्यामुळे तिच्या आयुष्यात आलेलं वादळ याविषयी कंगनाने काही मुलाखतींमध्ये स्पष्ट वक्तव्यंही केल्याचं पाहायला मिळालं. हे सर्व वातावरण आणि या चर्चा कुठे शमणार तोच ‘क्वीन’ कंगनाने पुन्हा एकदा त्याच आठवणी जागवत एका नव्या विषयाला तोंड फोडलं. ‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आपल्या आयुष्यात आतापर्यंत जितके रिलेशनशिप झाले ते सर्व ‘अनलकी’ होते, असं खुद्द कंगनाने स्पष्ट केलं आहे.

वाचा : Oscars 2018: ऑस्कर पुरस्काराविषयी ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

रिलेशनशिपमध्ये आपल्या परिने मी नेहमीच काही गोष्टींबाबत सतर्क राहण्याचा प्रयत्न केला. पण, काही बाबतीत मात्र मी अपयशी ठरले, असंही ती म्हणाली. वेळ जशी पुढे जात होती, तसतसं समोरच्या व्यक्तीने खोटी वचनं देण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासूनच नात्यात सर्वकाही चुकीच्या गोष्टी घडू लागल्या. रिलेशनशिपच्या बाबतीत कंगना अपयशी ठरली असली तरीही आता मात्र ती लग्न करण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या ‘क्वीन’च्या आयुष्यात येणारा किंग नेमका कोण असेल हेच जाणून घेण्यासाठी संपूर्ण कलाविश्व आणि चाहत्यांच्या वर्तुळात कुतूहल पाहायला मिळत आहे.

वाचा : प्रिय आईस.. तू माझं सर्वस्व होतीस, जान्हवी कपूरने जागवल्या श्रीदेवींच्या आठवणी

कंगनाच्या आयुष्यात येणाऱ्या ‘त्या’ खास व्यक्तीबद्दल अनेकांनी तर्क लावण्यास सुरुवात केली असली तरी खुद्द कंगना मात्र आगामी चित्रपटावरच लक्ष केंर्दित करत आहे. सध्या ती ‘मणिकर्णिका…’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात ती झाशीच्या राणीची भूमिका साकारत आहे.

First Published on March 4, 2018 2:31 pm

Web Title: bollywood actress kangana ranaut feels she was unlucky in her previous relationship