27 September 2020

News Flash

कंगनाने दादासाहेब फाळकेंचा उल्लेख बाबासाहेब केल्याने नेटकरी संतापले; म्हणाले ‘लाज वाटली पाहिजे…,’

ट्विटला उत्तर देताना कंगनाकडून अक्षम्य चूक

संग्रहित

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या महाराष्ट्र सरकारसोबत सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. कंगना रणौत ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडत असून आपल्यावर होणाऱ्या टीका आणि आरोपांना प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान यावेळी एका ट्विटला उत्तर देताना कंगनाकडून घोडचूक झाली आहे. कंगनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केला आहे. यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली.

ट्विटरला मनीष अग्रवाल यांनी कंगनावर आरोप करताना तुम्ही सर्वांवर निशाणा साधत पुढची वाटचाल करु इच्छित आहात असं म्हटल होतं. “करण जोहर असो किंवा अन्य कोणी निर्माता…सर्वांच्या मेहनतीने भारतीय चित्रपटृष्टी उभी राहिली आहे. कोणतीही इंडस्ट्री तुमच्याप्रमाणे सर्वांना शिव्या देत १-२ दिवसांत उभी राहत नाही,” असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं.

यावर कंगनाने उत्तर देताना दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केला. कंगनाने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “इंडस्ट्री फक्त करण जोहर आणि त्याच्या वडिलांनी उभी केलेली नाही. बाबासाहेब फाळकेंपासून ते प्रत्येक कलाकार आणि मजुराने उभी केली आहे. त्या जवानाने ज्याने सीमेचं रक्षण केलं, त्या नेत्याने ज्याने राज्यघटनेची सुरक्षा केली आहे, त्या नागरिकाने ज्याने तिकीट खरेदी करुन दर्शकाची भूमिका निभावली. इंडस्ट्री कोट्यवधी भारतीयांनी उभी केली आहे”.

दादासाहेब फाळकेंचा चुकीचा उल्लेख केल्याने कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली.

बाबासाहेब कोण?

त्या पुरस्काराचे नाव काय आहे समजून घ्या

ड्रामा क्विन नाव तरी नीट लिहा

बाबासाहेब की दादासाहेब?

लाज वाटली पाहिजे

दरम्यान आज सभागृहात शून्य प्रहरामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोक बदनाम करत असल्याचं जया बच्चन यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं. “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा”, असं त्या म्हणाल्या.

यावर कंगनाने उत्तर देत “जयाजी, माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला जर किशोरवयात कोणी मारहाण केली असती, तिला ड्रग्स दिले असते आणि तिच्यासोबत गैरवर्तणूक केली असती, तेव्हादेखील तुम्ही असंच म्हणाला असतात का? तसंच अभिषेक सातत्याने छळ व गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटक्याचं दिसून आला तर ? आमच्यासाठी सुद्धा कधीतरी प्रेमाने हात जोडण्याचा प्रयत्न करा”, असं म्हटलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 7:00 pm

Web Title: bollywood actress kangana ranaut mistake while addressing father of indian cinema dadasaheb phalke sgy 87
Next Stories
1 “मोठं होऊन मला तुमच्यासारखं व्हायचंय”; सोनम कपूरने जया बच्चन यांना दिला पाठिंबा
2 जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी? उर्मिला मातोंडकर कंगनावर संतापली
3 जया बच्चन यांनी बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी रवी किशन यांना दिले उत्तर, फरहान म्हणाला..
Just Now!
X