कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यामध्ये सुरु असलेला वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही असंच म्हणावं लागेल. प्रेमाच्या नात्याने सुरु झालेल्या त्यांच्या या प्रवासाला आता एक वादग्रस्त वळण मिळालं आहे. मुख्य म्हणजे बऱ्याच दिवसांपासून इतरांवर आरोप करणाऱ्या कंगनावरच हृतिकने काही गंभीर आरोप केले आहेत.

‘रिपब्लिक टीव्ही’ या टेलिव्हिजन वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हृतिकने कंगनावर आपला पाठलाग करण्याचे आणि अश्लील मेसेज पाठवण्याचे आरोप लावले आहेत. कंगनाच्या नंबरवरुनच हे मेसेज पाठवण्यात आले असल्याचे आरोप करत हृतिकने गेल्या वर्षी तिच्याविरोधात २९ पानांची तक्रार दाखल केल्याचंही म्हटलं आहे. त्या तक्रारीचा पुरावाही त्या वाहिनीने सादर केला.

Victim education
सामूहिक बलात्कारामुळे शिक्षण सुटले, न्यायालय म्हणाले…
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस: जनतेला दरवेळी मूर्ख बनवता येत नाही

कंगना नेहमीच हृतिकचा पाठलाग करत असून, त्याला ती स्वत:चा ‘इंटरनल लव्हर’ही म्हणवत होती. त्या तक्रारीत नमूद केल्यानुसार कंगनाच्या या अशा वागण्याकडे हृतिकने बऱ्याचदा दुर्लक्ष केलं. पण, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली होती.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

तक्रारपत्रात म्हटल्यानुसार हृतिकने कंगनासोबत कामापुरताच नातं ठेवले असून, तिने लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. अचानक हे तक्रारपत्र सर्वांसमोर उघड केलं जाणं आपल्यासाठी धक्कादायक असून हे सर्व टीआरपीसाठी करण्यात आलं असल्याचं मत कंगनाच्या वकीलांनी मांडलं आहे. हृतिक आता त्याची मलिन झालेली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न करतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. कंगनावर दाखल करण्यात आलेली एक जुनी तक्रार पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहता बहिण रंगोली पुन्हा एकदा तिची पाठराखण करण्यासाठी धावून आली आहे. ‘सर्वांनाच माहितीये पाठलाग कोण करतंय. कंगनाचा विषय सोडाच तुम्ही तुमच्या कुटुंबावर लक्ष द्या’, असं ट्विट करत रंगोलीने त्यात हृतिकला मेंशनही केलं आहे. तेव्हा आता रंगोलीच्या या ट्विटला हृतिक काय उत्तर देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.