02 December 2020

News Flash

वादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्हे, तर ‘या’ कारणामुळे होते कंगनाची चर्चा

...म्हणून सोशल मीडियावर होते कंगनाची चर्चा

संग्रहित

अभिनेत्री कंगना रणौत हे नाव चाहत्यांसाठी आता नवीन राहिलेलं नाही. अभिनयासोबतच कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेदेखील कायम चर्चेत असते. मात्र, यावेळी कंगना एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. कंगनाने पहिल्यांदाच चाहत्यांसोबत तिची एक कविता शेअर केली आहे.

कंगनाने अलिकडेच ट्विटरवर एक कविता शेअर केली असून ही कविता तिने स्वत:ला लिहिली आहे. विशेष म्हणजे या कवितेच्या माध्यमातून तिने हिमाचलच्या सौंदर्याचं वर्णन केलं आहे. सध्या सोशल मीडियावर कंगनाची ही कविता प्रचंड गाजत असून अनेकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘आसमान’ असं तिचं कवितेचं नाव आहे.


दरम्यान, कंगना सध्या तिच्या गावी हिमाचलमध्ये असून लवकरच ती तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाकडे वळणार आहे. मणिकर्णिकानंतर कंगनाचा तेजस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 9:22 am

Web Title: bollywood actress kangana ranaut share new poem ssj 93
Next Stories
1 शाहरुख ठरला बुर्ज खलिफावरचा ‘किंग’; फोटो पाहून व्हाल थक्क
2 उत्तर प्रदेशमध्ये ‘ससुरा बडा पइसा वाला २’ला तुफान प्रतिसाद; बॉक्स ऑफिसवरही सुसाट
3 ‘त्या’ तिघी सध्या काय करताहेत..?
Just Now!
X