X

‘या फोटोत कंगनासोबत तूच आहेस ना?’, रंगोलीचा हृतिकला सवाल

'आता सिद्ध कर की हा मॉर्फिंग केलेला फोटो आहे.'

कंगना आणि तिची बहीण गेल्या काही दिवासांपासून अभिनेता हृतिक रोशनवर बरेच आरोप करत आहेत. कंगना आणि हृतिकच्या बहुचर्चित रिलेशनशिपविषयीही बऱ्याच चर्चांनी जोर धरला होता. या सर्व प्रकरणामध्ये हृतिकने मात्र मौन पाळत या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण, आता त्याने कंगनाला प्रत्युत्तर देत आपली बाजू सर्वांसमोर स्पष्ट केली आहे. गुरुवारी हृतिकने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन चार पानी पत्र प्रसिद्ध करून आपली बाजू मांडली होती.

‘या प्रकरणाशी काही संबंध नसतानाही यात माझं नाव गोवण्यात आलं आहे’ असं हृतिकने पत्रात म्हटले आहे. पण, इथे कंगनाची पावलोपावली पाठराखण करणारी रंगोली पुन्हा एकदा हृतिकला धारेवर धरले. रंगोलीने जवळपास दोन तासांमध्ये दहा- बारा ट्विट करत हृतिकवर बऱ्याच प्रश्नांचा भडिमार केला. तिने या ट्विटध्ये हृतिकला मेंनशनही केलं आहे.

रंगोलीने हृतिक आणि कंगनाचा एक जुना फोटो पोस्ट केला. ज्या फोटोमुळेच यापूर्वी बराच वाद झाला होता. तो फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या ट्विटमध्ये तिने लिहिलं, ‘कंगनासोबत या फोटोमध्ये तूच आहेस ना? कोण आहे जो स्वत:हून तिच्याविषयी इतकी ओढ दाखवतोय’. या ट्विटनंतर तिने आणखी एक ट्विट केलं ज्यामध्ये तिने म्हटलं, ‘त्यावेळी तुझी पत्नीही तिथे होती. तर काय झालं? मला नक्की नाही माहीत पण, त्यावेळी आम्ही सर्वांनी तिच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा ऐकल्या होत्या. आता सिद्ध कर की हा मॉर्फिंग केलेला फोटो आहे.’

रंगोलीने या ट्विट्सद्वारे हृतिकवर थेट शब्दांमध्ये निशाणा साधला. त्यानंतर तिने एका ई-मेलचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला. जो हृतिकने कंगनाला पाठवला होता. रंगोलीने केलेला हा खुलासा पाहता आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. हृतिकने तीन वर्षांमध्ये ३ वकील बदलले. या तीन वर्षांमध्ये त्याचे उद्देशही बदलले असल्याचं तिने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता हृतिक रंगोलीच्या या आरोपांना काय उत्तर देतो याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain