२०१७ मध्ये ‘मिस वर्ल्ड’च्या किताबावर आपलं नाव कोरणाऱ्या मानुषी छिल्लरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ती नेमकी कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे, हाच प्रश्न तुमच्याही मनात घर करतोय ना? मानुषी कोणा चित्रपटातून नव्हे तर एका जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या जाहिरातीत ती अभिनेत्री करिना कपूरसोबत झळकत आहे. मुख्य म्हणजे या जाहिरातीच्या निमित्ताने तिचे लग्नावियीचे विचारही सर्वांसमोर आले आहेत.

लग्नाविषयी मानुषीचे विचार ऐकून अभिनेत्री करिना कपूरलाही सुखद धक्का बसला आहे. मानुषीच्या लग्नाचा विषय ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना? करिअरच्या अगदी सुरुवातीच्याच काळात मानुषी थेट लग्नाविषयी बोलेल, अशी अपेक्षाही अनेकांना केली नसावी. या विषयावरुन तुम्ही फार काही तर्क लावण्यापूर्वी एक महत्त्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण, एका जाहिरातीच्या निमित्ताने या विश्वसुंदरीने तिच्या लग्नाविषयीच्या काही अपेक्षा आणि स्वप्न सर्वांसमोर आणली आहेत.

वाचा : ‘या’ साऊथ सुपरस्टारच्या पुतणीसोबत प्रभासचे लग्न?

दागिन्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये करिना कपूर आणि मानुषी एकत्र आल्या असून, मोठ्या कलात्मकपणे ही जाहीरात साकारण्यात आली आहे. ज्यामध्ये आपलं लग्न नेमकं कसं असेल याचं चित्र मानुषी उभं करत आहे. एखाद्या सणाप्रमाणे आपल्या लग्नात उत्साह असेल असं म्हणताना तिच्या आवाजात आणि चेहऱ्यावर असणारे भाव पाहून अनेकजण मानुषीच्या प्रेमातच पडतील असं म्हणायला हरकत नाही. दागिन्यांच्या जाहीरातीच्या निमित्ताने अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या मानुषीचा हा अनोखा अंदाज पाहता आता येत्या काळात ती कोणत्या चित्रपटातून झळकली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

https://www.instagram.com/p/BhlrKxGhPGi/