21 February 2019

News Flash

आरजे करिना लवकरच तुमच्या भेटीला

बी टाऊनची बेगम आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज होत आहे.

करिना कपूर खान

कपूर कुटुंबातील अनेकांनीच या कलाविश्वात आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री करिना कपूर. अभिनय विश्वात करिनाने प्रेक्षकांची मनं जिंकत स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलंच. मातृत्व आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत तिने काही काळ पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येत चाहत्यांच्या मनाचा ताबा घेतला. अशी ही बी टाऊनची बेगम आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज होत आहे.

करिना नेमकी आता करणार तरी काय, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? या प्रश्नाचं उत्तर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालं असून, करिना येत्या काळात चक्क आर.जे.च्या रुपात दिसणार असून, रेडिओ शोचं सूत्रसंचालन करणार असल्याचं कळत आहे. आपला खूप चांगला मित्र करण जोहर याच्याच पावलावर पाऊल ठेवत आता ती या नव्या इनिंगसाठी सज्ज होत आहे.

वाचा : बाप्पा मोरया : आम्ही चालवू हा पुढे वारसा…..

डिसेंबर महिन्यापासून करिनाचा रेडिओ शो प्रसारित होणार असल्याचं कळत आहे. नुकतच तिने या शोसाठीचं फोटोशूट केल्याचंही पाहायला मिळत आहे. या नव्या इनिंगसाठी ती करण जोहरसोबत चर्चा करत असून, आता नेमकं तिच्या या कार्यक्रमाचं स्वरुप काय असणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे या रेडिओ शोच्या माध्यमातून रसिकांनाही करिनासोबत संवाद साधता येणार असल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा आता श्रोत्यांच्या मनावर बी टाऊनच्या बेगमची जादू चालणार का, हे येत्या काळात कळेलच.

First Published on September 14, 2018 3:03 pm

Web Title: bollywood actress kareena kapoor is going to debut on radio