News Flash

विराटबद्दल हे काय बोलून गेली करिना…? अनुष्का, ऐकतेयस ना गं?

'वीरे दी वेडिंग' या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री करिना कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.

करिना कपूर खान, अनुष्का शर्मा

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री करिना कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. तैमुरच्या जन्मानंतर करिनाचा हा पहिला चित्रपट असल्यामुळे तीसुद्धा यासाठी बरीच उत्सुक आहे. १ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये बेगम करिना आणि ‘वीरे दी वेडिंग’ची संपूर्ण टीम सध्या व्यग्र आहे.

अशाच एका कार्यक्रमाला करिनाने नुकतीच हजेरी लावली होती, त्यावेळी तिला, तुझ्या मते सर्वाधिक फिट क्रिकेटर कोण असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत बी- टाऊनचीही ही फिटनेस दिवा म्हणाली, ‘मला विराट कोहली हा त्याच्या फिटनेसमुळेच आवडतो. तो हॉटही आहे.’ अर्थात करिनाने या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यावेळी तिचा अंदाज अनेकांचीच मनं जिंकून गेला. विराटविषयी तिने दिलेली ही प्रतिक्रिया ऐकून आता त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मा कशी व्यक्त होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुळात विराटविषयी अशी प्रतिक्रिया देणारी करिना ही पहिलीच नाही. विराटचं प्रभावी व्यक्तीमत्त्वं पाहता त्याच्या चाहत्यांमध्ये फिमेल फॅन्सची संख्या जरा जास्तच आहे, हे तर खुद्द अनुष्काही ओळखून आहे.

दरम्यान, मोठ्या मिश्किल अंदाजात त्या प्रश्नाचं उत्तर देत पुढे करिना म्हणाली, ‘विराटचं लग्न झाल्यापासून मला माझा नवाबच (सैफच) जास्त आवडू लागला आहे. केन विलियमसनही मला खूप आवडतो.’ मोठ्या उत्साही अंदाजात करिनाने या प्रश्नांची उत्तर देत करिनाने पुन्हा एकदा सर्वांचीच मनं जिंकली.

माध्यमांच्या प्रश्नांना अफलातून उत्तरं देणारी करिना सध्या तिच्या आगामी चित्रपटातील लूकमुळेही चर्चेत आली आहे. ‘वीरे दी वेडिंग’च्या निमित्ताने ती अभिनेत्री सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तस्लानियासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच त्यातीच गाणीसुद्धा चाहत्यांची मनं जिंकत आहेत. त्यामुळे वीरेच्या लग्नाचा घातलेला हा सारा घाट आता प्रेक्षकांना कितपत भावतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 10:12 am

Web Title: bollywood actress kareena kapoor khan finds cricketer virat kohli hot anushka sharma are you listening this
Next Stories
1 ‘वीरे दी वेडिंग’सारखा चित्रपट मी पुन्हा कधीच करणार नाही- स्वरा भास्कर
2 सहमतची ‘अधुरी एक कहाणी’… ‘राजी’तील सहमतच्या पहिल्या प्रेमाबद्दल माहितीये का?
3 सोशल मीडियावर अचानक का होतेय ‘बाहुबली’तल्या कुमार वर्माची चर्चा?
Just Now!
X