26 February 2021

News Flash

‘…म्हणून मी लाइव्ह मुलाखतीदरम्यान जेवत होते’; अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण

वाचा, लाइव्ह मुलाखतीमध्ये अभिनेत्रीला का जेवावं लागलं

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री कस्तुरी शंकर एक व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. एक लाइव्ह मुलाखत सुरु असताना कस्तुरी जेवत असल्याचं पाहायला मिळालं. या घटनेनंतर जेवत असलेल्या कस्तुरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. यावर आता कस्तुरीने स्पष्टीकरण दिलं असून त्यावेळी नेमकं काय घडलं हे तिने सांगितलं.

“कस्तुरीने ट्विटरच्या माध्यमातून या घटनेचं स्पष्टीकरण दिलं आहे. मुलाखत सुरु असताना जवळपास ६० मिनिटे मी एकही शब्द न बोलता केवळ बसून होते. त्यामुळे मला वाटलं की जोपर्यंत माझं नंबर येत नाही, तोपर्यंत मी थोडीशी उसंत घेत जेवण करुन घेतलेलं बरं. त्यामुळे मी जेवायला गेले होते. परंतु, जेवायला जाताना मी स्काइप साइन ऑफ करायचं विसरुन गेले. मात्र कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता. हे सारं एका चुकीमुळे झालं”, असं ट्विट कस्तुरीने केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कस्तुरीने एका मुलाखतीत सहभाग घेतला होता. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर कलाविश्वातील घराणेशाही हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे याच विषयावर आधारित ही मुलाखत सुरु होती. त्यात कस्तुरी शंकर सहभागी झाली होती. परंतु, मुलाखत सुरु असतानाच जेवण करत असल्यामुळे ती ट्रोल झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 9:08 am

Web Title: bollywood actress kasturi shankar ate her meal on live tv debate says i waited 67 minutes ssj 93
Next Stories
1 दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्राची मुंबई पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता
2 ‘प्रवासी रोजगार’! सोनू सूदने स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी केला अ‍ॅप लाँच
3 आर्थिक परिस्थितीमुळे ‘या’ अभिनेत्रीवर आली राख्या बनवून विकण्याची वेळ
Just Now!
X