बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये स्वत:च्या हक्काचं स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. अत्यंत कमी वेळामध्ये कतरिनाने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात तिचा दबदबा निर्माण केला. उत्तम अभिनयशैली, फॅशनसेन्स आणि चेहऱ्यावरील गोड हास्य यामुळे बॉलिवूडच्या या बार्बी गर्लने अनेकांच्या मनावर राज्य केलं. आज कतरिनाचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळेच आज तिच्याविषयी माहित नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री होण्यापूर्वी कतरिना मॉडेलिंग प्रोजेक्ट्स करत होती. त्यासोबतच तिने अनेक तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं होतं. विशेष म्हणजे लंडनमधील एका शो दरम्यान दिग्दर्शक कैझाद गुस्ताद यांनी कतरिनाला पाहिलं आणि तेथेच त्यांनी तिला बूम या चित्रटाची ऑफर दिली. खरंतर कतरिनासाठी ही फार मोठी संधी होती, मात्र २००३ साली प्रदर्शित झालेला बूम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही गाजला नाही.

Tigress hunt crocodile with her cubs in rajasthan
राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल
How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
mithun chakraborty son namashi calls him mithun
मिथुन चक्रवर्तींना नावाने हाक मारतात त्यांची मुलं, कारण सांगत लेक नमाशी म्हणाला, “आम्ही वडिलांना…”
kalyan, dombivali, Slow Progress, Palawa Chowk Flyover, Concerns, mns mla raju patil, criticise kdmc and mmrda, political interferance, x social media, dr srikant shinde, bjp, ravindra chavhan, mahrashtra politics, lok sabha 2024,
मनसेचे राजू पाटील म्हणतात, जगातील दहावे आश्चर्य डोंबिवलीत

कतरिना कैफ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीच्या आडनावाविषयी फार कमी जणांना माहित आहे. कैफ हे कतरिनाच्या वडिलांचं आडनाव असलं तरीदेखील कतरिना प्रथम आईच्या आडनावामुळे ओळखली जायची. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कतरिना तिचं आडनाव ‘टरकोट’ असं लावायची. मात्र हे आडनाव उच्चारण्यास कठीण असल्यामुळे तिने ते बदलून वडिलांचं कैफ हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे कतरिना टरकोटची, कतरिना कैफ झाली.

दरम्यान,कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यावसायिक आहेत आणि आई सुझेन वकील आहे. कतरिनाला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे. कतरिनाच्या तीन मोठ्या बहिणींची नावे स्टेफनी, ख्रिस्टीन आणि नताशा असून मेलिसा, सोनिया आणि इसाबेल छोट्या बहिणींची नावे आहेत. तिच्या भावाचे नाव मायकल असे आहे. तिची बहिण इसाबेल कैफसुद्धा मॉडेल आणि अभिनेत्री आहे. कतरिना लहान असतानाच तिच्या आई-बाबांचा घटस्फोट झाला आणि तिचे बाबा युएसला गेले. त्यामुळे लहानपणापासून आईनेच सर्वांचे संगोपन केल्याचे कतरिनाने एका मुलाखतीत सांगितले होते.

२००९ मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत कतरिना म्हणालेली की, ‘मी वडिलांच्या संपर्कात नाही. माझ्या आईने सामाजिक कार्यासाठी स्वत:चे आयुष्य वाहून घेतल्याने त्यासाठी आम्हाला अनेक देशांमध्ये फिरावे लागत असे. हाँग काँगमध्ये माझा जन्म झाला, त्यानंतर चीन, जपान, नंतर जपानमधून बोटीने फ्रान्स, फ्रान्सनंतर स्वित्झर्लंड येथे राहिलो. काही युरोपीयन शहरांची मी अजून नावे नाही घेतली कारण आम्ही काही महिन्यांसाठीच तिथे राहिलो. त्यानंतर पोलंड, बेल्जियम, हवाई आणि मग लंडन येथे आलो.’