कसदार अभिनयशैली आणि दमदार चित्रपटांची निवड यामुळे विशेष चर्चिली जाणारी अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन. ‘पेज ३’, ‘ओमकारा’ आणि ‘लाइफ इन ए मेट्रो’ या चित्रपटामधून कोंकणाने तिचं अभिनय कौशल्य दाखवलं. बॉलिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या अभिनेत्रीने ‘इंदिरा’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘ए जे आछे कन्या’ या बंगाली चित्रपटातून तिने खऱ्या अर्थाने कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटानंतर तिने ‘मिस्टर अँण्ड मिसेस अय्यर’ या चित्रपटातून साऱ्याचं लक्ष वेधलं. त्यानंतर तिचा प्रत्येक चित्रपट लोकप्रिय झाला. खरंत तर आज कोंकणा लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु. तिला अभिनयाऐवजी अन्य एका दुसऱ्या क्षेत्रात करिअर करायचं होतं. एका मुलाखतीत तिने तिची ही इच्छा व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रसिद्ध दिग्दर्शिका अपर्णा सेन यांची लेक असलेल्या कोंकणाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी तिने त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यामध्ये, ‘जर आज अभिनेत्री नसतीस, तर कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतसं?’ असा प्रश्न कोंकणाला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत, “मी एक उत्तम सेक्रेटरी असते”, असं कोंकणा म्हणाली. त्यामुळे कोंकणाला अभिनेत्री होण्यापेक्षा सेक्रेटरी होण्याची इच्छा होती हे यावरुन दिसून आलं. तसंच तिने तिच्या आईविषयी आणि मुलाविषयीदेखील अनेक गोष्टी सांगितल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress konkona sen sharma not an actress was secretary ssj
First published on: 03-12-2020 at 08:23 IST