दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोस्ट हँडसम बॅचरल कोण? असा प्रश्न विचारला तर सहाजिकच अभिनेता प्रभासचे नाव प्रथम घेतले जाईल. ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर प्रभासची लोकप्रियता तुफान वाढली असून तरुणींमध्ये त्याची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे कायमच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा रंगत असते. आता एका बॉलिवूड अभिनेत्रीला प्रभासशी लग्न करायचे आहे. तिने एका मुलाखतीमध्ये ही इच्छा व्यक्त केली आहे.

सध्या प्रभास ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. नुकताच क्रितीने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला प्रभासशी संबंधीत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा : ‘हा नक्की प्रभासच आहे?’, ‘बाहुबली’चा विना मेकअप फोटो पाहून चाहते हैराण

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

मुलाखतीमध्ये प्रभास, टायगर श्रॉफ आणि कार्तिक आर्यन या तिन कलाकरांपैकी कोणासोबत फ्लर्ट करायला, डेट करायला आणि लग्न करायला आवडेल असा प्रश्न क्रितीला विचारण्यात आला. त्यावर क्रितीने मजेशीर अंदाजात उत्तर दिले. मला कार्तिकसोबत फ्लर्ट करायला आवडेल, टायगरला डेट करेन आणि लग्न प्रभासशी करण्याची इच्छा आहे असे उत्तर दिले. तिचे हे उत्तर ऐकून सर्वांना हसू अनावर झाले.

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी जवळपास ३५० ते ४०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ,तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच प्रभासचा ‘राधेश्याम’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.