News Flash

फोटोतल्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? होती सुशांतची जवळची मैत्रीण

कमी कालावधीत 'या' अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर केलं राज्य

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे प्रत्येक जण फेसबुक, ट्विट, इन्स्टाग्राम यांच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहत असतात. त्यातच सेलिब्रिटीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अनेक वेळा हे सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण किंवा आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यातच एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ही अभिनेत्री दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची जवळची मैत्रीण होती.

‘बरेली की बर्फी’, ‘हिरोपंती’, ‘पानिपत’ अशा चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री क्रिती सेनॉनने तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या वडिलांसोबत दिसून येत आहे. क्रितीने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून सध्या या फोटोची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

My favourite Man .. Love you Papa @sanonrahul

A post shared by Kriti (@kritisanon) on

क्रिती लहानपणी प्रचंड गोड दिसत असून या फोटोमधून तिने अनेकांची मन जिंकली आहेत.त्यामुळे सध्या अनेक जण त्याच्या वर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत. क्रितीने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Sometimes all you need is CHANGE!! #SummerHair

A post shared by Kriti (@kritisanon) on

कमी कालावधीत क्रिती लोकप्रिय अभिनेत्री झाली असून ती सुशांतची जवळची मैत्रीण होती. सुशांतच्या निधनानंतर क्रितीने त्याच्या घरच्यांची भेटही घेतली होती. या विषयी सुशांतच्या वडिलांनी एका मुलाखतीतदेखील सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 5:00 pm

Web Title: bollywood actress kriti sanon shares her childhood photo ssj 93
Next Stories
1 “सुशांतच्या आत्महत्येसंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न”; अभिनेत्रीचा धक्कादायक आरोप
2 सुशांतच्या आत्महत्येनंतर इन्स्टाग्रामवर वाढले तब्बल इतके लाख फॉलोअर्स
3 ‘लहान मुलीला पुरुषांसमोर उत्तेजक डान्स करताना दाखवणं कितपत योग्य?’; ‘रसभरी’ वेब सीरिजवरून प्रसून जोशींचा सवाल
Just Now!
X