News Flash

PHOTO : माधुरी- रेणुकाने जागवल्या ‘हम आपके है कौन’च्या आठवणी

'बकेट लिस्ट' या चित्रपटाच्या निमित्ताने माधुरी आणि रेणुका पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे.

हम आपके है कौन

‘दीदी तेरा देवर दिवाना…’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टचा भाग आहे. एखादी सहल असो किंवा मग शाळेतील स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम एकदातरी या गाण्यावर अनेकांचीच नजर जाते. ९० च्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ‘हम आपके है कौन’ या सुपरहिट चित्रपटातील हे गाणं. सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, मोनिष बहल, अनुपम खेर आणि इतरही बऱ्याच कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. अशा या सुपरहिट चित्रपटातील बहिणींची जोडी म्हणजेच अभिनेत्री माधुरी दाक्षित आणि रेणुका शहाणे या दोघींनीही नुकतीच ‘डीआयडी लिटील मास्टर्स’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.

‘बकेट लिस्ट’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्या या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या. यावेळी स्पर्धकांचा उत्साह पाहण्याजोगा होता. सुरेख लूकमध्ये या दोघींनीही यावेळी ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील आठवणींना उजाळा दिला. त्याशिवाय ‘लो चली मै’ या गाण्यावर ठेकाही धरला.

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

रेणुका शहाणेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला होता. त्यामुळे आता या डान्स रिअॅलिटी शोच्या नवा भाग पाहण्यासाठीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने माधुरी आणि रेणुका पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे. माधुरीचा मराठीतील हा पहिला चित्रपट असल्यामुळे सध्या तिसुद्धा बरीच उत्सुक असून, आता प्रेक्षक तिच्या या ‘बकेट लिस्ट’ला कशी पसंती देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 2:26 pm

Web Title: bollywood actress madhuri dixit dances with hum aapke hain koun fame renuka shahane on did lil masters see pics
Next Stories
1 सूत्रसंचालन करण्यास ‘भाईजान’ पुन्हा सज्ज
2 सलमानच्या ‘भारत’ला ‘दिशा’ गवसली!
3 ‘पोरस’, ‘महाकाली’ मालिकांच्या सेटला आग, संपूर्ण सेट जळून खाक
Just Now!
X