06 March 2021

News Flash

बॉक्स ऑफिसला आजही माधुरीच्या ‘बकेट लिस्ट’ची मोहिनी…

माधुरीने साकालेल्या भूमिकेमुळे आपल्या आयुष्यातील काही महत्वाच्या व्यक्तीच डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या

माधुरी दीक्षित, madhuri, Bucket List

एखादा चित्रपट निर्माण करताना निर्माता-दिग्दर्शकांची इच्छा असते, ती म्हणजे आपल्या सिनेमाशी प्रेक्षकांनी साधर्म्य साधावं, प्रेक्षकांचं मनोरंजन करावं आणि आपली कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी. हेच सुख सध्या ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाची संपूर्ण टीम अनुभवत आहे. काही दिवसांपूर्वीत प्रदर्शित झालेला माधुरी दिक्षितच्या पदार्पणातला मराठी सिनेमा ‘बकेट लिस्ट’ भारत आणि भारताबाहेरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

‘बकेट लिस्ट’मध्ये माधुरीने साकालेल्या भूमिकेमुळे आपल्या आयुष्यातील काही महत्वाच्या व्यक्तीच डोळ्यांसमोर उभ्या राहिल्याची प्रतिक्रिया काही प्रेक्षकांनी दिली आहे. तर, मधुरीच्या आयुष्य जगण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून कित्येक चाहते प्रेरितही झाले आहेत.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

‘डार्क हॉर्स सिनेमा’, ‘दार मोशन पिक्चर्स’, ‘ब्लू मस्टँग क्रिएशन्स’ यांची निर्मिती आणि ए. ए. फिल्म्स आणि करण जोहर प्रस्तुत, ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्करने केलं आहे. ‘बकेट लिस्ट’च्या निमित्ताने माधुरी बरोबरच धर्मा प्रोडक्शन चा मराठी सिनेविश्वातील प्रवेश वाखाणण्याजोगा असून यानिमित्ताने मराठी सिनेसृष्टी अजून एका सुंदर कलाकृतीने संपन्न झाल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2018 6:39 pm

Web Title: bollywood actress madhuri dixit starrer marathi movie bucket list gets a good run on box office
Next Stories
1 VIDEO : आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त… म्हणत ‘पुष्पक विमान’ प्रेक्षकांच्या भेटीला
2 टेलिव्हिजनचा ‘महादेव’ बॉलिवूडच्या वाटेवर
3 ‘तू माझा सांगती’ मालिकेत तुकोबांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस
Just Now!
X