News Flash

रुपेरी पडदासोडून आता माधुरी करणार ‘येथे’ काम?

येथील प्रेक्षकवर्ग तिच्यासाठी नवा असणार आहे.

क्रिकेटमध्ये जसे सचिनच्या तळपत्या बॅटचे दाखले दिले जातात, तसे मनोरंजनाच्या क्षेत्रात माधुरीच्या थिरकण्याचे दाखले दिले जातात. माधुरी दीक्षित नुसतं नाव जरी उच्चारल तरी बोलके डोळे, मधुर हास्य, कमरेचे लटके-झटके, थिरकती पावलं, अंगात प्रचंड ऊर्जा आणि मोहक चेहरा… डोळ्यासमोर येतात. आता हिच माधून रुपेरी पडद्यापासून दूर जाणार आहे. रिअॅलिटी शो, चित्रपट तसेच अनेक जबाबदारीच्या भूमिकेत दिसलेली माधूर आता नव्या विश्वात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ही नवी दुनिया चित्रपटगृह आणि बॉक्स ऑफिसच्या पलीकडली आहे. कारण, धक धक गर्लने ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यास हिरवा कंदील दिला आहे. ती लवकरच एका वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. येथील प्रेक्षकवर्ग तिच्यासाठी नवा असणार आहे.

 

View this post on Instagram

 

It’s the happy glow

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

या वेब सीरिजची निर्मिती बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहर करणार असल्याचे म्हटले जाते. ही वेब सीरिज एक फॅमिली ड्रामा असून सस्पेन्स थ्रिलर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. माधुरीच्या या वेब सीरिजचे नाव अद्याप समोर आलेले नाही. तसेच माधुरीसोबत कोणते कलाकार झळकणार हे देखील गुलदसत्यामध्ये ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 12:07 pm

Web Title: bollywood actress madhuri dixit to star in web series avb 95
Next Stories
1 आसावरीने बबड्याला कानाखाली मारताच नेटकऱ्यांनी केला जल्लोष
2 ‘तू सुंदर दिसत नाहीस’, म्हणत अभिनेत्रीला दिग्दर्शकाने नाकारलं
3 ‘आता आणखी सहन होत नाही’ म्हणत अरमान मलिकने डिलीट केले इन्स्टाग्रामचे सर्व पोस्ट
Just Now!
X