News Flash

असं आहे मलायका अरोराचं ‘वर्क फ्रॉम होम’; फोटो शेअर करत चाहत्यांना म्हणाली…

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अभिनेत्री मलायका अरोरा वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे. नुकताच मलायकाने तिच्या घरातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतून मलायकाचं वर्क फ्रॉम होम कसं असतं हे पाहायला मिळतंय.

मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने डेनिम जीन्स आणि पिवळ्या रंगांचं शर्ट परिधान केल्याचं दिसतंय. यावर तिने मॅचिंग पिवळ्या रंगाचे कानातले घातले आहेत. फोटोत मलायका सोफ्यावर बसून फोनमध्ये पाहत असल्याचं दिसून येतंय. यात तिने चष्मादेखील घातला आहे. नेहमीपेक्षा हटके असा हा मलायकाचा लूक सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

या फोटोच्या कॅप्शनमध्ये मलायका म्हणाली आहे, ” तयार व्हा आणि घरुन काम करा.” तर हॅशटॅगमध्ये तिने ‘स्टे होम’ आणि ‘मास्कअप’ म्हणत चाहत्यांना सध्याच्या संचारबंदीत घरीच रहा आणि मास्कचा वापर करा असा सल्ला दिला आहे.

तर यापूर्वी मलायकाने शेअर केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर तिने साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मलायकाने हातात अंगठी घातलेला एक फोटो शेअर केला. त्यामुळे मलायका आणि अर्जुनने साखरपुडा केला असं चाहत्यांना वाटू लागलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

‘अंगठी एखाद्या स्वप्नासारखी आहे. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्यासाठी भेटवस्तू घेऊ इच्छिता तर अंगठी हा उत्तम पर्याय आहे’ या आशयाचे कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. त्यामुळे  मलायका आणि अर्जुनचा साखरपुडा झाला नसून ती एखाद्या ब्रँडचे प्रोमोशन करत असल्याचं स्पष्ट झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 3:57 pm

Web Title: bollywood actress malaika arora share photo says get ready and work from home kpw 89
Next Stories
1 “मसाबा गुप्ता की ‘कराटे किड’मधला जेडन स्मिथ?’ चाहत्यांचा पडला प्रश्न!
2 ‘आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण…’, मुलाच्या आत्महत्येवर कबीर बेदींचा खुलासा
3 ‘आर्मी ऑफ द डेड’मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये एण्ट्री; दमदार ट्रेलर रिलीज
Just Now!
X