21 February 2019

News Flash

जाणून घ्या मल्लिका शेरावतला का हवीये सुषमा स्वराजची मदत ?

...म्हणून मल्लिकाने त्यांच्याकडे धाव घेतली

मल्लिका शेरावत, सुषमा स्वराज

सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी व्हायरल होतात हे खरं आहे. पण, याच माध्यमातून काही व्यक्तींची मदतही करता येणं शक्य होतं. रोजच्या आयुष्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून असंख्य लोक एकमेकांशी जोडले जातात. अशा या अनोख्या माध्यमाशी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही जोडल्या गेल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून स्वराज नेहमीच अनेकांची मदत करतात. हे पाहता अभिनेत्री मल्लिका शेरावतनेही आता त्यांच्याकडे मदत मागितली आहे.

‘फ्री अ गर्ल’ या एनजीओच्या सहसंस्थापकांची मदत करण्यासाठी मल्लिकाने त्यांच्याकडे धाव घेतली आहे. तिने स्वराज यांचा उल्लेख करत एक ट्विट केलं. ‘मॅडम, डच एनजीओ ‘फ्रि अ गर्ल’च्या संस्थापकाचा व्हिसा नाकारला जातोय. ही संस्था मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणा’वर खूप चांगले काम करतेय. त्यांच्या सुरक्षेसाठी काम करतेय. तुम्ही त्यांची मदत करावी अशी मी विनंती करते’, असं तिने या ट्विटमध्ये लिहिलं.

मल्लिका स्वत:सुद्धा या संस्थेशी जोडली गेली आहे. मानवी तस्करी आणि कामाच्या ठिकाणी लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण याविरोधात ही संस्था काम करते. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मल्लिका ‘स्कूल ऑफ जस्टिस प्रोग्राम’ची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. हा उपक्रमदेखील ‘फ्री अ गर्ल’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात येतो.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

गेल्या काही काळापासून मल्लिका कलाविश्वापासून दूर असली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती चाहत्यांच्या भेटीला येत असते. ‘वेलकम’, ‘शादी के साइट इफेक्ट्स’ आणि अशा बऱ्याच चित्रपटांमधून भूमिका साकारणारी मल्लिका तिच्या मादक अंदाजासाठीसुद्धा ओळखली जाते.

First Published on February 13, 2018 12:16 pm

Web Title: bollywood actress mallika sherawat approaches minister of external affairs of india sushma swaraj to help ngo