News Flash

स्तनपानाच्या मुद्द्यावरून खिल्ली उडवणाऱ्यांना लिसाचं सडेतोड उत्तर

अनेक महिला त्यांच्या मुलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्यास संकोचतात

छाया सौजन्य- बाझार

अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात नावारुपास आलेल्या लिसा हेडन सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने आपल्या मुलाला म्हणजेच झॅकला स्तनपान करतानाचा फो़टो पोस्ट केला होता. ज्यानंतर अनेकांनीच तिची खिल्ली उडवली होती. यावरून तिला बऱ्याच कार्यक्रमांमध्येही काही प्रश्नांचा किंबहुना खटकणाऱ्या प्रश्नांचा सामना करावा लागला होता. पण, आपण मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंच तिने ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना स्पष्ट केलं. ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये माध्यमांशी संवाद साधत होती.

‘तू अजूनही मुलाला स्तनपान करतेस का, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मी गोंधळले. तेव्हा माझ्या मुलाचा जन्म होऊन अवघे चार महिने झाले होते. काहींनी तर तू काही गाय नाहीस, असा सल्लाही मला दिला होता. मला या सर्व गोष्टींमुळे धक्काच बसला होता’, असं लिसा म्हणाली.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

स्तनपान करणं ही एक जबाबदारी आहे, असं समजणं गरजेचं नाही. ही एक नैसर्गिक बाब आहे. अनेक महिला त्यांच्या मुलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्यास संकोचतात, त्यामागे बरीच कारणं असतात, असंही तिने स्पष्ट केलं.
‘स्तनपान करण्यास अनेक महिला टाळतातही पण, मी मात्र या गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहते आणि इतर महिलांनीही, मातांनी स्तनपान केलं पाहिजे, असं त्यांना सांगू इच्छिते. ही संपूर्ण प्रक्रियाच जणू आई आणि बाळाच्या नात्यात एक वेगळा बंध निर्माण करते, त्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे,’ असा मुद्दाही तिने अधोरेखित केला. मातृत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आल्यानंतर एक आई म्हणून त्या सर्व गोष्टींमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठीच लिसा नेहमी प्रयत्नशील असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 12:35 pm

Web Title: bollywood actress model lisa haydon on breastfeeding her son
Next Stories
1 वडिलांसोबतच्या चित्रपटातून साराने घेतला काढता पाय
2 Mukesh Death Anniversary : अखेरच्या श्वासापर्यंत स्वरांची साधना करणाऱ्या मुकेश यांच्याविषयी बोलू काही…
3 Video : सलमानपाठोपाठ कतरिनाही झाली ‘डॉक्टर गुलाटी’साठी फोटोग्राफर
Just Now!
X