24 November 2017

News Flash

सोशल मीडियावरील पोस्टनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळालं काम

एका चांगल्या भूमिकेच्या मी शोधात होते.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 4:09 PM

अभिनेत्री नीना गुप्ता

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कामाची मागणी केली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला सोशल मीडियावर काम मागण्याची वेळ का आली असावी, हा प्रश्न तेव्हा अनेकांनाच पडला होता. आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या ‘मुल्क’ चित्रपटामध्ये त्यांना भूमिका मिळाली आहे.

याविषयी त्या म्हणाल्या की, ‘जेव्हा मी तळमळीने कामाच्या शोधात होते, तेव्हा दिग्दर्शक अनुभव सिन्हा मला भेटले. एका चांगल्या भूमिकेच्या मी शोधात होते. ‘मुल्क’ या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.’ तर नीना यांच्या अभिनयाचा मी नेहमीच चाहता होतो असं सिन्हा म्हणाले. नीना या भूमिकेसाठी योग्य आहेत. इन्स्टाग्रामवरील त्यांची पोस्ट वाचून मी लगेच त्यांना फोन लावला. इंडस्ट्रीमधील काही कलाकारांच्या कलेला वेळेचं बंधन नसतं आणि नीना या त्यापैकीच एक कलाकार आहेत,’ असं ते पुढे म्हणाले.

वाचा : करण म्हणतोय, ‘कंगना या गोष्टीपासून दूर राहा!’

I live in mubai and working am a good actor looking fr good parts to play

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

जुलैमध्ये नीना यांनी इन्टाग्रामवर आपला एक फोटो पोस्ट करत लिहिलं होतं की, ‘मी मुंबईत राहते आणि काम करते. मी एक चांगली अभिनेत्री असून एका चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे.’ ‘खलनायक’, ‘जाने भी दो यारों’, ‘कमजोर कडी’ आणि ‘गांधी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये नीना यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.. त्याचबरोबर ‘सांस’ आणि ‘बुनियाद’ या मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.
‘मुल्क’ या चित्रपटात ऋषी कपूर, नीना गुप्ता यांच्याशिवाय तापसी पन्नू, प्रतीक बब्बर आणि रजत कपूर यांच्याही भूमिका आहेत. वाराणसी आणि लखनऊमध्ये या चित्रपटाचे शुटिंग होणार असून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on September 13, 2017 4:07 pm

Web Title: bollywood actress neena gupta bags the role of rishi kapoors wife in mulk after she asked for work on instagram