अभिनेते, अभिनेत्र्यांचे ट्विटर अकाउंट हॅक होण्याच्या घटना वाढत चालल्या आहे. बॉलीवूड अभिनेत्री नेहा शर्मा हिचे ट्विटर अकाउंट देखील हॅकरकडून हॅक करण्यात आले होते. अकाउंट हॅक केल्यानंतर तिच्या अकाउंटमधून हॅकरने काही अश्लील फोटो देखील ट्विट केले. अकाउंट उघडल्यावर शेअर झालेले अश्लील फोटो पाहून नेहाला देखील धक्का बसला पण काही काळाने ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर लगेचच तिने हे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरून काढून टाकले. त्यानंतर तिने आपले अकाउंट हॅक केल्याचे देखील ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितले. तसेच अकाउंटवरून कोणतेही अश्लील फोटो प्रसिद्ध होत असल्यास लगेच कळवावे अशीही विनंतही तीने ट्विट करून आपल्या चाहत्यांना दिली. काही काळानंतर तिचे अकाउंट पूर्ववत झाले. ट्विट करत तिने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली, तसेच केलेल्या सहकार्याबद्दल आभार देखील मानले.
दोन दिवसांपूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांचे अकाउंट देखील हॅक करण्यात आले होते. रजनीकांत यांचे ट्विटरवर ३० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत, ट्विटरवर क्वचितच अॅक्टीव्ह असणारे रजनीकांत यांच्या अकाउंटवरून “रजनीकांत #हिटटूकिल” असे ट्विट करण्यात आले होते.
वाचा : रजनीकांत यांचे ट्विटर अकाऊन्ट हॅक
Someone hacked into my Twitter account..trying to fix it..apologies for any disturbing content…please know not me
— Neha sharma (@Officialneha) August 2, 2016
And a big thank u to all u guys for supporting me through this..
— Neha sharma (@Officialneha) August 2, 2016
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 4, 2016 4:55 pm