19 November 2019

News Flash

‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने ऋषभ पंतसाठी लिहिलेला खास संदेश पाहिला का?

तेव्हा आता ऋषभ आणि या अभिनेत्रीचा हा संवाद इथेच थांबणार की, त्याला आणखी कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

क्रीडा आणि कलाविश्वामध्ये असणारं नातं काही नव्याने सांगण्याची गरज नाही. मुळात बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वामध्ये असणाऱ्या नात्याची सर्वदूर चर्चाही होते. एखादा खेळाडू आणि कलाविश्वात योगदान देणाऱ्या कलाकारांचे जुळणारे सूत या नात्याविषयीच्या चर्चांना हवा देऊन जातात. अशीच एक चर्चा पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून गेली आहे. याला निमित्तं ठरलं आहे ते म्हणजे एका बॉलिवूड अभिनेत्रीने केलेलं ट्विट.

दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाच्या वतीने खेळणाऱ्या ऋषभ पंत या युवा खेळाडूची प्रशंसा करत अभिनेत्री नुसरत भरुचाने एक ट्विट केलं. ज्यामध्ये तिने आपल्याला ऋषभची फलंदाजी भावल्याचं म्हटलं आहे. ‘६३ चेंडूंमध्ये १२८ धावा… ऋषभ पंतचा अफलातून खेळ पाहून मजा आली’, असं ट्विट तिने केलं. तिच्या या ट्विटला ऋषभनेही उत्तर दिलं. फार काही न बोलता ऋषभने तिचे आभार मानले.

वाचा : महेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…

‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटांमुळे नुसरत प्रकाशझोतात आली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तिचं हे ट्विटही बरंच चर्चेत आलं आहे. अनेकांनी तर ऋषभ आणि नुसरतचं हे ट्विटर प्रकरण जरा जास्तच मनावर घेतल्याचं पाहायला मिळालं. आपल्या फलंदाजीच्या बळावर ऋषभ आयपीएलच्या ११व्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी पार पडताना दिसत आहे. आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही तो अग्रस्थानी आहे. तेव्हा आता ऋषभ आणि नुसरतचा हा संवाद इथेच थांबणार की, त्याला आणखी कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published on May 15, 2018 1:40 pm

Web Title: bollywood actress nushrat bharucha tweet about cricketer rishabh pant ipl 2018
Just Now!
X