News Flash

परिणीती चोप्राचे स्टायलिश शूज कलेक्शन, चाहतेही आवाक्

परिणीती ही नेहमीच तिच्या लूक आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

परिणीती चोप्राचे स्टायलिश शूज कलेक्शन, चाहतेही आवाक्

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच परिणीतीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. यात तिचे शूज कलेक्शन पाहायला मिळते. परिणीतीचा हा फोटो पाहून तिचे चाहतेही आवाक झाले आहेत.

परिणीती ही नेहमीच तिच्या लूक आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिने परिधान केलेले अनेक कपडे हे दिसायला फार स्टायलिश असतात. फक्त कपडेच नव्हे तर तिचे सँडल्स, शूज, बॅग्स याच्याही अनेकदा चर्चा रंगतात. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शूज कलेक्शनचे फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटो ती एका खुर्चीत बसली असून शूज शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या फोटो ती एका ठिकाणी उभी असल्याचे दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

“केवळ पाच मिनिटात तयार, हे माझे वचन आहे,” असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर फक्त तिचे चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्या आहेत. परिणीतीला शूजचे कलेक्शन करण्याचा छंद आहे. तिच्याकडे जवळपास विविध ब्रँडचे शूज वापरते. परिणीती अनेकदा विविध शूज परिधान करते. एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्याकडील शूज कलेक्शनबद्दल म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

परिणीतीचे लागोपाठ ३ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ‘द गर्ल ऑन द ट्रेन’, ‘सायना’ आणि ‘संदीप और पिंकी फरार’ असे या तीन चित्रपटांची नावं आहेत. हे तीन ही चित्रपट लॉकडाऊनमुळे ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या चित्रपटांना जास्त लोकप्रियता मिळाली नाही मात्र, अनेकांना परिणीतीचा अभिनय प्रचंड आवडला आहे. ती लवकरच रणबीर कपूरसोबत ‘एनिमल’ या चित्रपटात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2021 8:03 pm

Web Title: bollywood actress parineeti chopra massive shoe collection on social media viral nrp 97
Next Stories
1 चिमुकल्यासोबत ऐश्वर्या रायचा २७ वर्ष जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
2 ‘कारण आम्हाला लाज नाही…’, स्वरा भास्करने शेअर केला व्हिडीओ
3 “उदय चोप्रा आणि मी पाच वर्ष…”; नरगिस फाकरीने अखेर सोडलं मौन
Just Now!
X