सध्याच्या घडीला हिंदी आणि आंतरराष्ट्रीय कलाविश्वातही एकाच गोष्टीच्या चर्चा सुरु आहेत. ती चर्चा म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या साखरपुड्याची. साधारण वर्षभरापासूनच त्यांच्या नात्यांच्या चर्चांना उधाण आलं होतं. सरतेशेवटी कुटुंबांच्या साक्षीने या दोघांनीही त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली. प्रियांकाच्या आयुष्यातील या खास दिवशी तिला शुभेच्छआ देण्यासाठी अभिनेत्री आणि तिची चुलत बहिण परिणीची चोप्राही उपस्थित होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावरुन परिणीतीने प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर करत त्यासोबतच्या कॅप्शनमधून त्यांच्या सुरेख नात्याचा उलगडा केला आहे. लहानपणी खेळलेल्या भातुकलीच्या खेळाची आठवण करत परिणीतीने त्याची जोड प्रियांका आणि निकच्या नात्याला दिली आहे. कळत नकळत आपण लहानपणी जो खेळ खेळायचो, लाजऱ्या नवरीप्रमाणे वावरायचो, एका राजकुमाराची वाट पाहायचो… तसंच काहीसं प्रियांकासोबत आज प्रत्यक्षात घडत असल्याचं तिने या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

वाचा : Priyanka Chopra Nick Jonas Engagement : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

निक हा आपल्या बहिणीसाठी सर्वतोपरी उत्तम आणि साजेसा मुलागा असल्याचं म्हणत आता यापुढे त्याने प्रियांकाची काळजी घ्यावी अशी विनंतीही त्याला केली आहे. परिणीतीने लिहिलेलं ते कॅप्शन वाचून बहिणींचं नातं काय असतं याचीच प्रचिती येत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress parineeti chopra wishes sister priyanka chopra nick jonas
First published on: 19-08-2018 at 11:11 IST