20 November 2019

News Flash

अभिनेत्री पूजा बत्रा विवाहबंधनात, सेक्रेड गेम्समधील ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ

पूजा बत्रा ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा कोणताही गाजावाजा न करता विवाहबंधनात अडकली आहे. आपला प्रियकर नवाब शाहसोबत पूजा बत्राने लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी पारंपारिक पद्धतीने विवाह केल्याची माहिती आहे. लवकरच दोघे लग्नाची रितसर नोंदणी करणार असल्याचं वृत्त मुंबई मिररने दिलं आहे. पूजा बत्राचं हे दुसरं लग्न आहे. लॉस अँजेलस येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ सोनू अहलुवालियासोबत २००३ मध्ये तिचं लग्न झालं होतं. पण २०११ रोजी तिचा घटस्फोट झाला होता.

पूजा बत्रा ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. हसीना मान जायेगी, भाई आणि विरासत हे तिचे चित्रपट प्रामुख्याने गाजले होते. अनिल कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या नायक चित्रपटातही पूजा दिसली होती. मात्र यानंतर तिने बॉलिवूडपासून फारकत घेतली होती.

 

View this post on Instagram

 

Man Crush Everyday @nawwabshah

A post shared by Pooja Batra (@poojabatra) on


नवाब शाहने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भाग मिल्खा भाग, दिलवाले, डॉन, टायगर जिंदा है चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. याशिवाय नेटफ्लिक्सवरील गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’मध्येही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या तो ‘पानिपत’ आणि ‘दबंग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

First Published on July 12, 2019 3:11 pm

Web Title: bollywood actress pooja batra gets married sgy 87
Just Now!
X