News Flash

साखरपुड्याची जय्यत तयारी, प्रियकरासवे ‘देसी गर्ल’चा थाट भारी

परदेशी पाहुण्यांसोबतच बॉलिवूडमधून करण जोहर, रणवीर सिंग, मनिष मल्होत्रा, सोफी चौधरी आणि इतरही बरेच प्रसिद्ध चेहरे पीसीच्या एंगेजमेंट पार्टीची रंगत वाढवतील

प्रियांका चोप्रा, निक जोनास, Priyanka Chopra and bae Nick Jonas

प्रियांका चोप्रा आणि तिचा प्रियकर निक जोनास सध्या भारतात आले असून त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. साखपपुड्याच्या निमित्ताने बी- टाऊन आणि प्रियांकाच्या इतर मित्रमंडळींसाठी एका जंगी पार्टीचंही आयोजन करण्यात आल्याचं कळत आहे. दरम्यान, साखपुड्यापूर्वी ही ‘देसी गर्ल’ आणि निक खास क्षण व्यतीत करण्याला प्राधान्य देत असून, त्यांना एका डिनर डेटवर गेल्याचं पाहायला मिळालं.

प्रियांका आणि निकच्या मागोमागच त्यांचे कुटुंबियसुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मायदेशी परतलेली प्रियांका फारच आनंदात दिसली. त्यासोबत तिच्या हातालीच अंगठीसुद्धा बरंच काही सांगून गेली. काही दिवसांपूर्वी हीच अंगठी लपवणाऱ्या प्रियांकाने यावेळी मात्र तसं काहीच केलं नाही. किंबहुना निकचा हात पकडून ती मोठ्या आनंदात माध्यमांच्या समोर आली.

वाचा : काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट

गेल्या महिन्यात प्रियांकाच्या वाढदिवसाच्याच दिवशी निकने तिला प्रपोज केलं होतं. ज्यानंतर या सेलिब्रिटी जोडीवरच सर्वांच्या नजरा खिळल्या. खुद्द प्रियांका आणि निकने अद्यापही माध्यमांसमोर त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नसली, तरीही आता मात्र थेट कलाविश्वाच्याच साक्षी ने ही जोडी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करणार आहे. सूत्रांचा हवाला देत ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्रियांका आणि निकच्या साखपुड्याच्या निमित्ताने अेरिकेहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी जवळपास २०० खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. परदेशी पाहुण्यांसोबतच बॉलिवूडमधून करण जोहर, रणवीर सिंग, मनिष मल्होत्रा, सोफी चौधरी आणि इतरही बरेच प्रसिद्ध चेहरे पीसीच्या एंगेजमेंट पार्टीची रंगत वाढवतील असं कळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 12:10 pm

Web Title: bollywood actress priyanka chopra and bae nick jonas take their families out ahead of engagement celebration
Next Stories
1 विवस्त्र होण्याची मागणी करण्यात आली होती, ‘बॉन्ड गर्ल’चा खुलासा
2 Home Trailer : ‘कॅम्पा कोला’वर आधारित वेब सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?
3 सुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर
Just Now!
X