News Flash

चाललंय तरी काय? निकच्या कौटुंबिक कार्यक्रमात प्रियांकाची उपस्थिती

मेट गालाच्या रेड कार्पेटपासून सुरु झालेला 'देसी गर्ल' प्रियांका आणि निकच्या प्रेमाचा हा सिलसिला आता बराच पुढे आला आहे.

प्रियांका चोप्रा, निक जोनास, Priyanka Chopra, Nick Jonas

Priyanka Chopra, Nick Jonas. अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळेही प्रकाशझोतात आली आहे. अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत असलेलं प्रियांकाचं नातं तिला प्रकाशझोतात आणण्यामागचं कारण ठरत आहे. मेट गालाच्या रेड कार्पेटपासून सुरु झालेला ‘देसी गर्ल’ प्रियांका आणि निकच्या प्रेमाचा हा सिलसिला आता बराच पुढे आला आहे.

बेसबॉल सामना, डिनर डेट अशा विविध ठिकणांवर एकत्र हजेरी लावल्यानंतर प्रियांकाने निकच्या कौटुंबिक कार्यक्रमातही हजेरी लावल्याचं नुकतच पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना जेएफके विमानतळालावर एकत्र पाहण्याच आलं होतं. ज्यानंतर आता सोशल मीडियावर रॅशेल तंबुरेलीच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने या दोघांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. निकच्या नातेवाईकांची प्रियांकाची ही वाढती जवळीक आणि त्यांच्या नात्यात दिवसागणिक येणारी सहजता पाहता येत्या काळात देसी गर्ल आणि निक त्यांच्या नात्याविषयी अधिकृत माहिती देण्याची चिन्हं नाकारता येत नाहीत.

रॅशेलच्या लग्नाच्या निमित्ताने प्रियांका निकची डेट म्हणून त्याच्यासोबत गेली होती अशा चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगत आहेत. यावेळी तिने गोल्डन- मस्टर्ड रंगाच्या शेडमधील एक सुरेख ड्रेस घातला होता. तर, निकसुद्धा टक्सेडोमध्ये तिला शोभून दिसत होता. या लग्नोहळ्यात प्रियांकाने निकच्या सर्व निकटवर्तीयांसोबत संवाद साधत एकच कल्ला केल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत

‘टीएमझेड’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार निकने त्याच्या मोठ्या भावाला म्हणजेच केव्हिन आणि त्याची पत्नी डॅनिअलला प्रियांकाची ओळख करुन दिली. निकच्या पालकांची प्रियांकाने भेट घेतली की नाही, याविषयी कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही. पण ‘देसी गर्ल’ने त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची भेट घेतल्याचा अंदाजही वर्तण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:23 pm

Web Title: bollywood actress priyanka chopra arrives as bae nick jonas date at his cousins wedding
Next Stories
1 Video : ..जेव्हा जान्हवी शाहरुखला पुरस्कार प्रदान करते
2 ‘माझ्यासाठी प्रेम बनलंच नाही, हे सत्य मी स्वीकारलंय’- मनीषा कोइराला
3 Donald Trump Kim Jong Un summit : जाणून घ्या किम जोंगला का सलाम करत आहेत ऋषी कपूर
Just Now!
X