काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. भारतात आलेल्या प्रियांकाने तिच्या आणि निकच्या कुटुंबियांच्या साक्षीने या नात्यातील नव्या वळणाचं मोठ्या आनंदात स्वागत केलं. मुख्य म्हणजे निक आणि त्याचे कुटुंबिय भारतात आल्यावर ‘देश तसा वेश’ याच मंत्राचा अवलंब करताना दिसले. ते आपल्या होणाऱ्या सूनेच्या देशात तितक्याच सहजपणे वावरत होते. मुख्य म्हणजे प्रियांकासोबत त्यांनी काही ठिकाणांना भेटही दिली. ज्यामुळे अर्थातच ‘देसी गर्ल’च्या चेहऱ्यावर आनंद खुलला.

सेंट कॅथरिन अनाथ आश्रमालाही निक, प्रियांका आणि निकच्या कुटुंबियांनी भेट दिली. यावेळी प्रियांकाने अनाथ आश्रमातील लहानग्यांसमोर सुरेख असं नृत्य सादर केलं. तर तिच्या होणाऱ्या पतीने म्हणजेच निकने तिच्या आनंदाखातर आणि अनाथ आश्रमातील त्या मुलींसाठी एक गाणंही गायलं.

वाचा : Priyanka Chopra Nick Jonas Engagement : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

खुद्द प्रियांकानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये निक गाणं गाताना दिसत असून प्रियांका आणि त्या अनाथ आश्रमातील मुली त्याच्या गाण्याला टाळ्या वाजवून साथ देत असल्याचं पाहायल मिळत आहे. तर निकचे वडील त्यांच्या मोबाईलमध्ये हे खास क्षण कैद करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर प्रियांकाने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत बरेच व्ह्यूज मिळाले असून त्याला लाखो लाइक्सही मिळाले आहेत.