20 October 2020

News Flash

अन् प्रियांकाला मिळाले ११ हजार पुष्पगुच्छ, १८ हजार पत्र आणि बरंच काही….

प्रियांकावर झालेली ही प्रेमाची उधळण पाहता तिच्यासाठीसुद्धा ही एक सुखद गोष्ट ठरत आहे.

प्रियांका चोप्रा, priyanka chopra

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकताच ३६ वा वाढदिवस साजरा केला. प्रियकर निक जोनाससोबत प्रियांकाने हा खास दिवस साजरा केल्याचं कळत आहे. एकिकडे संपूर्ण कलाविश्वातून तिला शुभेच्छा दिल्या जात अतसातान देशोदेशीच्या चाहत्यांनीसुद्धा या ‘देसी गर्ल’ला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं.

न्यूयॉर्कमधील प्रियांकाच्या घरी चाहत्यांनी तिच्या नावे पुष्पगुच्छ आणि असंख्य पत्र पाठवल्याचं पाहायला मिळालं. सुत्रांचा हवाला देत ‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जवळपास ११ हजार पुष्पगुच्छांशिवाय प्रियांकाच्या नावे १८ हजार पत्र चाहत्यांनी पाठवली असून, जवळपास २५ देशांतील असंख्य चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सहसा भेटवस्तू मिळतातच. पण, प्रियांकाच्या बाबतीत या भेटवस्तू, पुष्पगुच्छ आणि पत्रांचा आकडा सध्या अनेकांनाच थक्क करुन जात आहे हे खरं.

युनिसेफच्या सदिच्छा दूतपदी असणाऱ्या प्रियांकाने विविध उपक्रमांच्या प्रचारासाठी आजवर बऱ्याच देशांना भेट दिली आहे. त्यावेळी प्रत्येकवेळी प्रियांकाला तिचे चाहतेही भेटले, अशाच चाहत्यांनी तिच्यावर या शुभेच्छांचा आणि भेटवस्तूंचा वर्षाव केला.

वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा

मुख्य म्हणजे ज्या समाजोपयोगी कामांसाठी प्रियांकाने पुढाकार घेतला आहे त्या कामांमध्ये आर्थिक पद्धतीने आपलं योगदान देत ‘देसी गर्ल’ला अनोख्या पद्धतीनेही काही चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, वाढदिवसाच्या निमित्ताने प्रियांकावर झालेली ही प्रेमाची उधळण पाहता तिच्यासाठीसुद्धा ही एक सुखद गोष्ट असणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 4:12 pm

Web Title: bollywood actress priyanka chopra birthday gifts includes thousands of bouquets and handwritten letters fans shower love on the actor
Next Stories
1 Full Tight : मैत्री, प्रेम आणि पालकत्व अशा संकल्पनांना स्पर्श करणारी मराठी वेब सीरिज
2 कॅन्सरविषयी मुलाला सांगावं तरी कसं, सोनालीपुढे होता पेच
3 ..म्हणून इन्स्टाग्रामने केला जॅकलिनचा सन्मान
Just Now!
X