20 January 2021

News Flash

मायदेशी परतताच ‘देसी गर्ल’ भावुक, म्हणते…

एकिकडे आपल्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच चर्चा सुरु असतानाच प्रियांका मात्र तिच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे.

प्रियांका चोप्रा, priyanka

कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर कोणाचाही वरदहस्त नसताना आपल्या अभिनयाच्या आणि कतृत्त्वाच्या बळावर नावारुपास येणाऱ्या कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा. एका सौंदर्यस्पर्धेपासून सुरु झालेल्या तिच्या प्रवासाने तिला आज आंतरराष्ट्रीय ख्यातीपर्यंत पोहोचवलं आहे. हिंदी सोबतच परदेशी कलाविश्वातही तिचा सहज वावर पाहून या ‘देसी गर्ल’चा अनेकांनाच हेवा वाटतो. सध्या प्रियांका चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या खासगी आयुष्यामुळे.

एकिकडे आपल्या खासगी आयुष्याविषयी अशा चर्चा सुरु असतानाच प्रियांका मात्र तिच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे. या साऱ्याच्या निमित्ताने ती मायदेशी परतली आहे, ही सर्वात महत्त्वाची बाब. प्रियांका सध्या ‘द स्काय इज पिंक’ या आगामी चित्रपटाच्या कामानिमित्त भारतात आली आहे. यादरम्यानच ती कुटुंबासोबतही काही खास क्षण व्यतीत करत आहे. आपल्या कुटुंबापासून बराच काळ दूर राहणाऱ्या प्रियांकाला तिच्या आईचं फारच कौतुक वाटत असल्याचं तिची भावनिक पोस्ट वाचून लगेचच लक्षात येत आहे. आईने ज्या प्रकारे कुटुंबाला एकसंध ठेवलं आहे, तिने ज्या प्रमाणे आम्हाला सांभाळलं आहे यासाठी मी तिचे खूप आभार मानते, असं म्हणत प्रियांकाने काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं.

पाहा : Loveratri Trailer : ‘लवरात्री’तून पाहता येणार नौरात्रोत्सव आणि प्रेमाचे अनोखे रंग

इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही तिने बाबांचा एक फोटो पोस्ट केला. प्रियांका तिच्या वडिलांसाठी खूपच जवळची होती. त्यांच्या जाण्यानंतर ती नेहमीच कुठेतरी त्यांनाच आठवत असायची. साकरता तिने आपलं मन मोकळं करण्यासाठी म्हणून सोशल मीडियाचाही बऱ्याचदा आधार घेतला. अशी ही देसी गर्ल येत्या काळात निक जोनास या अमेरिकन गायकासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचंही म्हटलं जात आहे, त्यामुळे प्रियाकांच्या चाहत्यांध्ये बराच उत्साह पाहायला मिळतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 2:03 pm

Web Title: bollywood actress quantico star priyanka chopra writes emotional note thanked mom
Next Stories
1 ज्यासाठी प्रियांकानं ‘भारत’ सोडला, त्याचं भविष्यच टांगणीला?
2 ‘…तर मग बॉलिवूड चित्रपटांच्या कथानकाबाबत तक्रार करू नका’; शूजित सरकार संतापला
3 Stree song Kamariya: ‘कमरिया’मधील नोराच्या अदांनी प्रेक्षक पुन्हा घायाळ
Just Now!
X