21 January 2019

News Flash

आदित्य चोप्रा करण जोहरसारखा असता तर मी त्याच्या प्रेमातच पडले नसते- राणी मुखर्जी

करण यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राणी मुखर्जी, करण जोहर

एकाएकी अभिनेत्री राणी मुखर्जी प्रकाशझोतात येण्याचे कारण म्हणजे तिचा आगामी चित्रपट ‘हिचकी’. बोलताना होणाऱ्या अडचणीमुळे एका शिक्षिकेला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते आणि या सर्व अडचणींवर मात करत ती यातून कशी वाट काढते हा मुद्दा ‘हिचकी’ या चित्रपटाच अधोरेखित केला गेला आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विविध कार्यक्रमांना हजेरी लावतेय. अशाच एका कार्यक्रमानंतर राणीने पत्रकारांशी संवाद साधत करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्याविषयी एक वक्तव्य करत अनेकांचेच लक्ष वेधलं.

आपल्या पतीसोबतच्या नात्याविषयी सांगताना राणी म्हणाली, ‘आदित्यच्या प्रेमात पडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे आयुष्यातील काही खासगी गोष्टी तो कधीच सर्वांसमोर आणत नाही. या कलाविश्वात इतकी वर्षे काम केल्यानंतर तो एक असा व्यक्तींपैकी एक आहे ज्याचा मी प्रचंड आदर करते. ज्या व्यक्तीविषयी तुम्हाला सर्वकाही माहिती आहे अशा व्यक्तीचा आदर करणं खरंतर कठीणच आहे. पण, आदित्यचा मी आदर करते हेच खरं. मीसुद्धा काही खासगी गोष्टी सर्वांसमोर आणत नाही आणि त्याचा स्वभावही अगदी तसाच आहे.’

पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

आदित्यविषयी मनमोकळेपणाने बोलताना राणीने आणखी एक बाब स्पष्ट केली. ‘जर आदित्य करण जोहरप्रमाणे असता तर मी त्याच्या प्रेमातच पडले नसते. करण सगळीकडेच असतो, सोशल मीडियापासून इतरही ठिकाणी तो सक्रिय आहे. प्रत्येक दिवशी तो काही ना काही करत असतो. माझं अगदी त्याच्याविरुद्ध आहे. त्यामुळे आदित्य त्याच्याप्रमाणे असता तर मी त्याच्या प्रेमात पडलेच नसते. मी कुटुंबाला प्राधान्य देते. सतत काहीतरी कारणांनी, चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने माझा पती माझ्यापासून, कुटुंबापासून दूर असता तर मला वेडच लागलं असते. मुळात अर्ध्याहून अधिक काळ आमची गाठच पडली नसती. पण, तसं नाहीये. कारण, आदित्य सोशल मीडिया आणि इतर माध्यमांपासून बऱ्यापैकी दूर आहे. कामावरुन घरी परतल्यावर तो कुटुंबालाही वेळ देतो’, असे ती म्हणाली. सोशल मीडियावर इतर कलाकारांच्या तुलनेत जरा जास्त सक्रिय असणाऱ्या करणविषयी राणीने केलेलं हे वक्तव्य ऐकल्यानंतर आता करण यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published on January 8, 2018 12:55 pm

Web Title: bollywood actress rani mukerji says if aditya chopra was to be like karan johar i wouldnt have fallen in love hichki