News Flash

Makar Sankranti 2018 : जाणून घ्या राणी मुखर्जीचा मकर संक्रांतीचा प्लॅन

'हिचकी' या आगामी चित्रपटातून राणी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज

राणी मुखर्जी

बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जी आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘हिचकी’ या आगामी चित्रपटातून राणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, सध्या ती या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बरीच मेहनत घेताना दिसतेय.

आपल्यात असणाऱ्या एखाद्या गोष्टीची कमतरता लक्षात घेत त्यावर मात करुन ध्येयपूर्तीसाठी झटणारी एक व्यक्तिरेखा राणी या चित्रपटात साकारत आहे. अशा या भन्नाट कथानक असणाऱ्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी राणीने मकर संक्रांतीच्या दिवसाची निवड केल्याचे वृत्त ‘डीएनए’ने प्रसिद्ध केले आहे. राणीच्याच टीममधील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, विविध ठिकाणी जाऊन चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी राणीने मकर संक्रांतीच्या दिवसाची निवड केली आहे. सूर्यदेवतेची पूजा करत आपल्या वाट्याला आलेल्या यशाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यामुळे या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेत राणीने हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

संक्रांतीचे उत्साही वातावरण लक्षात घेत राणीने अहमदाबादमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत या चित्रपटाची प्रसिद्धी करण्याचा कार्यक्रम आखल्याचे कळत आहे. ‘हिचकी’ या चित्रपटाला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राणी देशातील विविध आठ शहरांना भेट देणार आहे. त्यासोबतच संक्रांतीच्या निमित्ताने गुजरातच्या दौऱ्यावर असणारी ही अभिनेत्री त्या ठिकाणी होणाऱ्या पतंगबाजीमध्येही सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. तेव्हा ‘हिचकी’च्या निमित्ताने राणी संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करणार असे म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2018 2:16 pm

Web Title: bollywood actress rani mukerjis special plans for hichki on festival makar sankranti 2018
टॅग : Makar Sankranti
Next Stories
1 ब्रिटनच्या राजघराण्याची सून होणाऱ्या मेगनची सोशल मीडियावरुन एक्झिट
2 करण- कंगनामधील वादाची ठिणगी विझली, पण..
3 …म्हणून नाना पाटेकरांकडे फराह खानने त्या सिनेमाचा प्रस्ताव नेलाच नाही?
Just Now!
X