News Flash

आदिराशिवाय मी श्वासही घेऊ शकत नाही – राणी मुखर्जी

आई होणं ही फार वेगळी गोष्ट आहे.

राणी मुखर्जी

अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या चित्रपटांपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर मात्र ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. सध्याच्या घडीला ती एका आईच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. २०१४ मध्ये निर्माता आदित्य चोप्रासोबत विवाहबद्ध झालेल्या राणीच्या आयुष्यात गेल्या वर्षी एका चिमुकलीचं आगमन झालं. आदिराच्या जन्मानंतर राणीने तिच्या संगोपनाकडेच जास्त लक्ष देण्याला प्राधान्य दिलं. तिने सहसा आदिराला प्रसारमाध्यमांपासूनही दूर ठेवलं. एक आई म्हणून राणीच्या नेमक्या काय भावना आहेत हे तिने एका पत्रातून व्यक्तही केलं होतं.

या पत्रातून तिने आदिरावर असणारं प्रेम व्यक्त करत तिच्याशिवाय आपण श्वासही घेऊ शकत नाही असं म्हटलं होतं. आदिराच्या येण्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं असंही ती म्हणाली होती. सोशल मीडियावरुन आपल्या भावनानांना वाट मोकळी करुन देत राणीने मातृत्वाविषयीचे तिचे विचारही मांडले होते. ‘आई होणं ही फार वेगळी गोष्ट आहे. तुम्ही अचानक स्वत:साठी जगणं सोडून देता. तुम्ही जन्म दिलेल्या बाळासाठीच जगू लागता’, असं राणीने एका पोस्टमध्ये लिहिलं होतं. अभिनेत्री ते आई होण्यापर्यंतचा तिचा प्रवास हा फार वेगळा असल्याचं तिच्या या पोस्टमधून पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आदिराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये आदिरासुद्धा दिसत होती. मुख्य म्हणजे नेहमी आदिराला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवणाऱ्या राणीने यावेळी मात्र छायाचित्रकारांपासून तिचा चेहरा लपवला नाही.

वाचा : आमिरला चित्रपटात दगा देणारा ‘तो’ झाला यशस्वी अभिनेता

rani-mukerji-adira_

screen-shot

एका अर्थी आपल्या राहणीमानात होणारे बदल, समोर येणारे प्रसंग यासाठी राणी आदिराला तयार करत आहे असं म्हणायला हरकत नाही. मुलीवर खूप प्रेम आहे. मी तिच्याशिवाय श्वासही घेऊ शकत नाही’. राणी मुखर्जी बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी खासगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये योग्य तो समतोल राखला आहे. लग्नानंतरही राणीने तिचे चित्रपटसृष्टीतील काम सुरुच ठेवलं होतं. त्यानंतर आता मात्र ती आदिरावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे राणी मुखर्जी ‘परफेक्ट मॉम’ आहे असंच म्हणावं लागेल.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 11:04 am

Web Title: bollywood actress rani mukherjee daughter adira beautifully aditya chopra celebrity mom
Next Stories
1 जाणून घ्या, आदिनाथ कोठारे का मानतोय पंतप्रधान मोदींचे आभार
2 ‘महाराजांच्या नावाचा राजकीय वापर मला पटत नाही’
3 वैभव-पूजाच्या प्रेमाची हटके कहाणी
Just Now!
X