28 September 2020

News Flash

पुढच्या जन्मी माझ्याशी लग्न करशील का? विचारणाऱ्याला रवीनाचं भन्नाट उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रीय असते

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रीय असते. रवीना टंडन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करत असते. नुकतेच तिने आपल्या पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठणींना उजाळा दिला. मात्र यावेळी एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर रवीना टंडनने भन्नाट उत्तर देत नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.

रवीना टंडनने नुकतंच आपल्या पतीसोबतचे काही फोटो शेअर केले होते. हे जुने फोटो असून रवीना पतीसोबत फिरण्यासाठी गेली होती तेव्हाचे आहेत. रवीनाने फोटो शेअर करताना जुन्या आठवणी असल्याचा उल्लेखही केला आहे. रवीनाने फोटो शेअर करताच एका चाहत्याने कमेंट करत पुढच्या जन्मात माझ्याशी लग्न करशील का? अशी विचारणा केली.

सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणाऱ्या रवीनानेही आपल्या चाहत्याला लगेचच उत्तर देत , “माफ कर..सात जन्मासाठी मी आधीच बूक आहे” म्हटंल. रवीना टंडनचं हे उत्तर नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं आहे. सोबतच रवीना आणि तिच्या पतीमधील संबंध किती घट्ट आहेत हेदेखील दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

रवीनाने पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. १९९० मध्ये रवीनाने एका मुलीला दत्तक घेतलं होतं. तेव्हा तिचं लग्न झालं नव्हतं. २००४ मध्ये रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीसोबत लग्न केलं. २००५ मध्ये रवीनाच्या मुलीचा जन्म झाला. तर २००८ मध्ये मुलाचं आगमन झालं. रवीना टंडन लवकरच संजय दत्तसोबत  KGF: Chapter 2 मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. प्रेक्षकांनाही चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 12:55 pm

Web Title: bollywood actress raveena tandon reply to fans wedding proposal sgy 87
Next Stories
1 शर्लिन चोप्राने सांगितला कास्टिंग काऊचचा कोडवर्ड
2 “चिंटू सर, कहा सुना माफ”,…म्हणून ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सलमान खानने मागितली माफी
3 गरजूंच्या मदतीसाठी भाईजान तत्पर; बैलगाडी झाल्यानंतर ‘बिइंग हंगरी’चा ट्रक रवाना
Just Now!
X