18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

#Cinescope : …म्हणून रेखा बुरखा घालून कोर्टात गेल्या!

'वो रेखा है जनाब...'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 1:51 AM

छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज

हिंदी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरची संकल्पना दरदिवशी नव्याने सर्वांसमोर येत असते. मुळात या संकल्पनेची सुरुवात केव्हा झाली याची माहिती कोणालाच नाहीये. पण, प्रत्येक कलाकाराने त्याच्या त्याच्यापरिने ग्लॅमर अनुभवले असून, त्यासाठी स्वत:चे असे योगदान दिले आहे. अशाच काही कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेत्री रेखा. ‘इन आखों की मस्ती के..’ हे गाणं जणू रेखा यांच्यासाठीच लिहिण्यात आलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

रेखा आणि चर्चा हे जणू एक समीकरणच बनलं आहे. ही अभिनेत्री जिथे जाते तिथे एका नव्या चर्चेला उधाण येते. नेहमी भरजरी साड्या आणि मेकअपमध्ये दिसणाऱ्या रेखा एकदा चक्क बुरख्यात बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल चर्चा सुरु झाली होती. आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीने बुरख्यात येण्याचं नेमकं कारण काय? हा प्रश्न तेव्हा अनेकांना पडला होता…? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ..

रेखा यांच्या जीवनात त्यांना प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. त्यांच्या अदांचे लाखो चाहते आहेत. पण खासगी जीवनात मात्र त्यांना फारसं यश आलं नाही. कुटुंबसुखापासून त्या काहीशा दूरच राहिल्या. त्यांच्या खासगी जीवनाविषयी जाणून घेण्याचा बऱ्याचजणांनी प्रयत्न केला. पण…. ‘वो रेखा है जनाब…’ त्यांच्या खासगी जीवनातील फार काही माहिती प्रसारमाध्यमांच्या हाती लागली नाही.

रेखा यांच्यासोबत असे बरेच प्रसंग घडले आहेत. त्यामुळे कलाकारांचे आयुष्य या कलाविश्वात आल्यावर त्यांच्यापुरता मर्यादित राहत नसून इतरांनाही त्यांच्या जीवनात रस वाटू लागतो आणि मग त्याचाच त्रास या कलाकारांना सहन करावा लागतो.

First Published on April 21, 2017 1:51 am

Web Title: bollywood actress rekha went to court wearing burkha and here is the reason why she wore burkha